Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

मुंबई, ठाणे जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 19, 2025 | 04:18 PM
मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्‍यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्‍यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (19 ऑगस्ट) मंगळवारी मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली. मुंबईतील मिठी नदीची आणि नदी काठच्या परिसराचा आढावा घेतला तसेच विक्रोळी पार्कसाईट येथील दरप्रवण परिसराची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात शिवसेना आमदार दिलीप लांडे उपस्थित होते.

पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

ठाण्यातील नौपाडा तसेच कोपरीमधील चिखलवाडी येथे पाणी साचले आहे. हा परिसर सखल भाग असल्याने तिथे जरा पाऊस झाला की पाणी भरते. पंप लावून तेथील पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाण्यात २२५ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे काम सुरु असून पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

वांद्रे येथील मिठी नदीचा आणि नदी काठच्या परिसराचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वी विक्रोळी पार्कसाईट येथे वर्षा नगर या डोंगराळ वस्तीवर दरड कोसळली होती. या दरडप्रवण परिसराची आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीबाबत सकाळी मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील फोनवर चर्चा झाली आहे. मिठी नदी काठच्या परिसरात ‘एनडीआरएफ’ची पथके, बोटी तैनात आहेत. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन परिस्थिती हातळण्यासाठी सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांनी काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

मुंबईत किती पाऊस पडला?

आयएमडीच्या आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या २१ तासांत मुंबईच्या विक्रोळी उपनगरात सर्वाधिक १९४.५ मिमी पाऊस पडला. हवामान खात्याने सांगितले की सांताक्रूझमध्ये १८५ मिमी, जुहूमध्ये १७३.५ मिमी, भायखळामध्ये १६७ मिमी आणि वांद्रेमध्ये १५७ मिमी पाऊस पडला. कुलाबा आणि महालक्ष्मी भागात अनुक्रमे ७९.८ मिमी आणि ७१.९ मिमी पाऊस पडला.

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

Web Title: Mumbai rain news eknath shinde reviews the rainfall situation in mumbai and thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
3

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी
4

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.