वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांची बरीच स्वप्न अपूर्ण राहतात. अनेकजण असे असतात की, त्यांना महागाईमुळे स्वत:चं हक्काचं घर विकत घेता येत नाही. अशावेळी भाडेकरु म्हणून राहावं लागतं. तुम्ही जर घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडा (MHADA) ने सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किंमतीत घर उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. म्हाडा मुंबईत 3600 घरं उभारणार असून विविध उत्पन्नाच्या गटातील लोकांसाठी ही घरं उपलब्ध होणार आहेत. नेमकी ही घरं कुठे उभारली जाणार आहेत पाहा…
[read_also content=”ठाकरेंच्या वांद्र्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी, मोदींच्या शपथविधीपूर्वी लागले बॅनर https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-put-up-a-banner-wishing-modi-on-swearing-in-near-matoshree-uddhav-thackeray-544495.html”]
२०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबईकरांसाठी 3600 घरे उपलब्ध करून देण्याचे म्हाडाचे नियोजन आहेत. यामध्ये मुंबईतील पवई, मागाठाणे, कन्नमवार नगर, पहाडी गोरेगाव, अॅन्टॉप हिल अशा ठिकाणी ही घरं उभारली जाणार आहे. मागील वर्षी 2024-23 म्हाडाने ऑगस्ट महिन्यात 4082 घरांसाठी मुंबईत लॉटरी काढली होती. 4082 घरं उपलब्ध असताना या घरांसाठी तब्बल 1 लाख 22 हजार अर्ज आले होते. आता 3600 घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबई बोर्डाच्या 2023 मध्ये जाहीर झालेल्या 4028 घरांच्या लॉटरीपैकी अद्याप 150 घरांची विक्री झालेली नाही. जर वेटिंग लिस्टमधील अर्जदारांना मागील सोडतीतील उर्वरित घरांचं वाटप करण्याची प्रक्रिया सुरु आहे. वेटिंग लिस्टमधील अर्जदारांना पैसे भरुन घर घेण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे. या संधीनंतरही घरं विकली गेली नाहीत, तर पुढील लॉटरीत या घरांचा समावेश केला जाईल. े न
वर्षभरात १३ हजार नव्या घरांच्या निर्मितीचं उदिष्ट्यं
२०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबई आणि मुंबई उपनगरसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांतदेखील म्हाडा घरं उभारणार आहे. या अंतर्गत जवळपास १२ ते १३ हजार घरांची निर्मिती होणार आहे.