फोटो सौजन्य सोशल मिडिया
या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा उद्देश शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व शासकीय सेवा नागरिकांपर्यंत थेट आणि पारदर्शकपणे पोहोचवणे हा मूळ उद्देश असून त्यानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात आयोजित या शिबिरात नागरिकांना विविध महसुली दाखले व प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
या शिबिरात अधिवास प्रमाणपत्रे 05 वाटण्यात आली, 10 उत्पन्न दाखले वाटण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 05 प्रमाणपत्रे आणि नॉन-क्रिमीलेअरचे 05 दाखले वाटण्यात आले. अशा एकूण 25 दाखल्यांचे वाटप ‘सेवा संकल्प अभियानात’ करण्यात आले. याशिवाय इतर प्रकारच्या 12 दाखल्यांचेही वितरण करण्यात आले. ‘आपले सरकार सेवा केंद्रां ‘ मार्फत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक प्रमाण पत्रांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले आहेत.
नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द
महाविद्यालयातील तरुणांसाठी नवीन मतदार नोंदणी स्टॉल, तसेच निराधार व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची माहिती देणारा स्टॉल उभारण्यात आला होता. अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले आणि विविध शासकीय योजनांच्या लाभांविषयीही नागरिक व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी बाळासाहेब तिडके, किर्ती महाविद्यालयाचे उपप्राचार्य महाजन, तहसीलदार संकेत यमगर आणि नायब तहसीलदार प्रभाकर नाईक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासकीय सेवा व योजनांचा लाभ नागरिकांनी अधिकाधिक घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.






