मुंबईतील माहीममध्ये अग्नितांडव! दोघांचा होरपळून मृत्यू
अहमदाबादमध्ये विमान अपघातात २६५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज मुंबईतील माहिमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. माहीमध्ये एसी कॉम्प्रेसर फुटून लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
परवानगी नसतानाही अवजड वाहनांची पुण्यात ‘एंट्री’; तब्बल इतक्या जणांनी गमवला जीव
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, माहीम परिसरात एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केलं. स्थानिकांना आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत आगीत अडकेल्या दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे कर्मचारी आणि माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीत अडकलेल्या बाकीच्या लोकांना सुरक्षित बाहेर काढलं. दरम्यान आग कशामुळे लागली याचा माहीम पोलीस तपास करत आहेत.