राजा रघुवंशीसह आणखी एका महिलेच्या हत्येचा प्लॅन
Raja Raghuvanshi Case: इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्याप्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राज रघुवंशीच्या हत्येच्या आरोपात पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि इतर साथीदारांनाही अटक करण्यात आली. हे सर्वजण अटकेत असले तरीही या ह्त्येचे गूढ अद्यापही पूर्णत: उकललेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मेघालय पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, राजा रघुवंशी यांची हत्या केल्यानंतर सोनम आणि तिचा प्रियकर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणखी एका महिलेच्या हत्येचा कट रचत होते.कोणत्याही एका महिलेला ठार मारायचे, तिचा मृतदेह पूर्णपणे जाळायचा, आणि तो मृतदेह सोनमचा असल्याचे भासवायचे, जेणेकरून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने जाईल, असा दोघांचा प्लॅन होता.
MNS BJP Alliance: राज ठाकरेंसाठी हा सौदा फायद्याच्या की तोट्याचा; काय आहेत राजकीय समीकरणे?
हा खुसाला समोर आल्यानंतर या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी या षडयंत्राची माहिती मिळवून त्या संभाव्य पीडितेचा बचाव केला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकरणातील क्रूर नियोजन व खोटेपणाचे स्वरूप पाहता, तपास यंत्रणांवर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
याशिवाय, सोनमचा प्रियकर राज कुशवाह हा हत्येच्या कटाचा सूत्रधार होता, तर सोनमनेही त्याला या षडयंत्रात साथ दिली होती. सोनमच्या चौकशीच्या पहिल्या दिवशी तिचा प्रियकर राज आणि इतर तिघांनीही या संपूर्ण प्लॅनिंगची कबूली दिली होती. सोनम बुरखा घालून मेघालयातून पळून गेली होती. टॅक्सी, बस आणि ट्रेन अशा विविध वाहतुकीच्या साधनांचा वापर करून ती मध्य प्रदेशातील इंदूरला पोहोचल्याचे त्यांनी सांगितले होते.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत ATS ची एन्ट्री; डीव्हीआर जप्त अन्…
पोलिस अधीक्षक विवेक सयाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालयात राजाच्या हत्येचा कट राज आणि सोनम यांनी ११ मे रोजी त्यांच्या लग्नानंतर रचला होता. ही योजना राजची होती आणि सोनमने त्याला सहमती दर्शवली होती. इतर तीन आरोपी राजचे मित्र होते. हे सुपारी देऊन हत्या करण्याचे प्रकरण नव्हते, पण योजना खून करण्याची होती.राजच्या सहकारी मित्रांनी त्या हत्या करण्यासाठी त्याला सर्व मदत पुरवली होती.
राजने त्याच्या मित्रांना खर्चासाठी ५०,००० रुपये दिले होते. तर राजा रघुवंशीला मारण्यासाठी दोन योजना आखल्या गेल्या होत्या. पहिली योजना होती की सेल्फी काढताना राजाला ठार मारण्याची. जर असे झाले नाही तर प्लॅन बी पाळला जाईल. म्हणजे राजाला आधी मारले जाईल. मग त्याला दरीत ढकलून दिले जाईल. जेव्हा पहिला प्लॅन अयशस्वी झाला, तेव्हा आरोपीने प्लॅन बी नुसार राजाची हत्या केली.