'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती
मुंबई: आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली असून, या अधिवेशनात विधानसभेला उपाध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे असल्याने, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून राजकुमार बडोले यांच्या नावावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक समतोल राखण्यासाठी आणि अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राजकुमार बडोले यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महिलांच्या छेडछाडीपासून धनंजय मुंडेंपर्यंत..; सरकारला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांचे ‘ते’ 11 वार
दुसरीकडे, विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. या अधिवेशनात या पदावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा आहे, तसेच आदित्य ठाकरे आणि सुनिल प्रभू यांच्या नावांचाही विचार सुरू असल्याचे समजते. विरोधी पक्षनेतेपदासाठी इतर दोन पक्षांचा पाठिंबा आवश्यक असल्याने, या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याची रणनीती आखली आहे. नेहमीप्रमाणे विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसतात, परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वेगळ्याच अंदाजात सरकारचा निषेध केला.
Karjat News: उल्हासनदीवर पुलाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष; पुलाच्या दुरावस्थेबाबत कधी सुटणार प्रश्न ?
हातात बेड्या घालून विधान भवनात दाखल झालेले जितेंद्र आव्हाड हे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांना पाहताच सर्व माध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बेड़्या घालून यायचे कारण काय? हा प्रश्न उपस्थित झाला.
माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले,“अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. जे कार्यकर्ते व्यक्त होत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. आम्हाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. हे मूलभूत अधिकार कायम राहिले पाहिजेत, त्यासाठी मी या बेड्या घालून निषेध नोंदवत आहे.”
विरोधकांनी आधीच सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याची तयारी केली आहे. महागाई, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था आणि विविध घोटाळ्यांच्या मुद्द्यावर विरोधक सरकारला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या या आंदोलनामुळे अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक पवित्रा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.