Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

नुकत्याच पार पडलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पुणे पंचायत समिती निवडणुकांनंतर आता सभापती, उपसभापती आणि अध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 04:27 PM
मुळशीमध्ये नव्या 'पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

मुळशीमध्ये नव्या 'पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

Follow Us
Follow Us:
  • मुळशीमध्ये ‘नवा पॅटर्न’ची चर्चा
  • भोरमध्ये चिट्ठीवर सभापती?
  • सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पुणे पंचायत समिती निवडणुकांनंतर आता सभापती, उपसभापती आणि अध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असली, तरी काही तालुक्यांत सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत. विशेषतः भोर आणि मुळशी येथे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

 

भोर पंचायत समितीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी चार जागा मिळाल्याने स्पष्ट बहुमत कुणालाही नाही. त्यामुळे सभापतीपदाची निवड चिट्ठीद्वारे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोरमध्ये समसमान जागा झाल्यामुळे चिट्ठीवरच सभापती ठरेल. आम्ही कोणाच्या सोबत जाणार नाही, अशी भूमिका स्थानिक पातळीवर मांडली जात आहे. त्यामुळे भोरमध्ये सत्ता स्थापनेसाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

मुळशीमध्ये सत्ता समीकरणांची चाचपणी

मुळशी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन जागांपैकी दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने, तर एक जागा भाजपने जिंकली आहे. पंचायत समितीत सहापैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाला आणि एक जागा भाजपला मिळाली आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने आघाड्यांची चर्चा रंगली आहे.

स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी, “मुळशीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडून आलेले सदस्य आमचे जुने सहकारी आहेत. ते आमच्यासोबत येऊन सत्ता स्थापन करतील,” असा विश्वास व्यक्त केला.

मुळशीतील सत्तानाट्य रंगत

दुसरीकडे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजप आणि शरद पवार गटाच्या सदस्यांसोबत सत्ता स्थापनेचे संकेत दिले आहेत. “योग्य वेळी तुम्हाला कोण कोणा बरोबर आहे, हे मुळशीमध्ये समजेल, असा संदेश दिला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुतीचाच सभापती होणार असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे भाजप आणि शरद पवार गटातील संभाव्य समीकरणांमुळे मुळशीतील सत्तानाट्य रंगत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अंतिम क्षणी कोणत्या पक्षाची बाजी लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे

राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला?

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी नियमानुसार त्यातील पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठरली आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या अडीच वर्षांत ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला राबविण्याबाबत अंतर्गत स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Political activities have increased for the election of chairpersons in many panchayat samiti in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • BJP
  • MP Sharad pawar
  • Panchayat Samiti Election

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
2

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
3

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं
4

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.