Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती यांच्या निवडीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्याने नवनिर्वाचित सदस्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 02:48 PM
Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे
Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा
  • नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे
  • इच्छुकांची संख्या वाढली
पुणे : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती यांच्या निवडीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्याने नवनिर्वाचित सदस्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक नेमकी कधी जाहीर होणार, याचीच सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांची अधिसूचना प्रसिद्ध झाली असली, तरी पदाधिकारी निवडीसंदर्भात प्रशासनाकडून ठोस हालचाल झालेली नाही.

 

कायद्यानुसार पदाधिकारी निवडीसाठी सर्वसाधारण सभा बोलाविण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात. मात्र, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी एकाच दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याबाबत ग्रामीण विकास विभागाकडून एकत्रित आदेश येतात का, याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे. सोमवारपर्यंत राज्यस्तरावरून कोणतेही निर्देश न आल्यास जिल्हास्तरावर स्वतंत्रपणे निवडणुकीची कार्यवाही सुरू करण्याचा विचार प्रशासनात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागीय आयुक्तांच्या स्तरावरही सर्व जिल्ह्यांसाठी एकच तारीख निश्चित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परंपरेनुसार प्रथम पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती निवडले जातात. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी सभा बोलावली जाते. त्यामुळे पंचायत समिती निवडणुकीच्या तारखेनंतरच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होईल, असे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्षांमध्येही पदाधिकारी निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.

हे सुद्धा वाचा : राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी

इच्छुकांची संख्या लक्षणीय

अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या लक्षणीय असल्याने पक्षांतर्गत बैठका, चर्चा आणि रणनीती आखल्या जात आहेत. एकंदरीत, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा आता निर्णायक टप्प्यात आली असून, सोमवारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे नवनिर्वाचित सदस्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला?

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी नियमानुसार त्यातील पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठरली आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या अडीच वर्षांत ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला राबविण्याबाबत अंतर्गत स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: The number of aspirants for the post of pune zilla parishad president has increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
1

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
2

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
3

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
4

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.