सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.
सरकारने ऊसाला प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत.
दोन वर्षांत माळेगाव कारखाना कर्जमुक्त करु, असे आश्वासन माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री तथा चेअरमन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.
युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजीत पवार यांच्या हस्ते प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता पैशाचे सोंग करता येत नाही असे एका शेतकऱ्याला म्हणाले होते. यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संतापजनक प्रतिक्रीया दिली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा अतिरिक्त तपास करण्यासाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह त्यांच्यासोबतच्या इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आता हाके यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.
अरुणकुमार डोंगळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे गोकुळच्या पुढील निवडणुकीचे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
बारामती शहर हे औद्योगिक, शैक्षणिक व कृषी दृष्ट्या महत्त्वाचे ठरत असले तरी गेल्या काही वर्षांत शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढलेली वाहनसंख्या ही मोठी समस्या ठरत आहे.
बारामती शहराचा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) लवकरच समावेश होणार असून या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला आहे. संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अंजली कृष्णा यांनी अजित पवार यांना त्यांच्या स्वतःच्या फोनवर फोन करण्यास सांगितले. यावेळी अजित पवारांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत महिला अधिकाऱ्याला धमकावले.