Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिकेचा मनमानी कारभार; अजय चौधरींच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा ‘हंडा मोर्चा’ 

शिवडी परिसरात पाण्याच्य़ा समस्यमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या कार्यालयावर ‘हंडा मोर्चा’ करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 08, 2024 | 04:32 PM
शिवडी-परळ भागात महापालिकेचा मनमानी कारभार; अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा ‘हंडा मोर्चा’

शिवडी-परळ भागात महापालिकेचा मनमानी कारभार; अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा ‘हंडा मोर्चा’

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: शिवडी परळ भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत रितसर तक्रार करुनही पालिकेने नागरिकांच्या समस्यांकडे डोळेझाक केली आहे असा आरोप करण्यात आलेला आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी आज महानगरपालिकेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा आंदोलन केलं आहे. महाविकास आघाडीतील शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना हे आंदोलन केलं आहे.

हेही वाचा-  Assembly Elections 2024: “हरयाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल हे…”; चंद्रशेखर बावनकुळेंनी केले मोठे वक्तव्य

शिवडी-परळ विभागातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी, महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयावर धडक ‘हंडा मोर्चा’ नेण्यात आला. येत्या दसऱ्यापर्यंत माझ्या मायभगिनींचा पाणी प्रश्न हा सुटलाच पाहिजे, असा इशारा आमदार अजय चौधरी यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. त्याचबरोबर शिष्टमंडळाला रीतसर निवेदन देऊन, पाणी प्रश्नावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

हेही वाचा- Vidhansabha 2024: हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.! निकालावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया

शिवडी परळ भागातील नागरिकांच्या या समस्येला महायुती सरकार जबाबदार असल्याची टीका आमदार अजय चौधरी यांनी केली आहे. अजय चौधरी म्हणाले की, ज्या विभागात विरोधी पक्षातील आमदार आहेत; त्या त्या भागातील स्थानिकांना जाणूनबुजून त्रास देण्याची, त्यांच्या समस्या वाढविण्याची मिंधे-भाजप सरकारची नीती आहे. सर्व सामान्य मध्यमलवर्गीय नागरिकांच्या पाण्याच्या समस्येकडे ठरवून दुर्लक्ष करणाऱ्यांना कार्यकर्ते म्हणावं का ? असा अजय चौधरी य़ांनी मिंधे भाजप सकरावर हल्लाबोल केला आहे.

अजय चौधरी पुढे असंही म्हणाले की, ह्या महायुती सरकारच्या सत्ताधारी कपटीपणापुढे आम्ही कधीच हतबल होणार नाही. शिवडी-परळवासियांच्या हक्कासाठी मी अजय चौधरी सदैव लढत राहणारच, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणारच असं आश्वासन त्यांनी शिवडी परळ भागातील नागरिकांना दिलं आहे.

 

 

Web Title: Arbitrary administration of municipal corporation in shivdi paral area citizens handa morcha under the leadership of ajay chaudhary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 04:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.