कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ?
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.5) शपथ घेतली. गेल्या पाच वर्षांपासून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीसांचे चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते. तो क्षण अखेर सत्यात उतरला. हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यापूर्वीच्या निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.
हेदेखील वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा झाला शपथविधी; आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नवी माहिती समोर…
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना महिन्याला 3.4 लाख रुपये वेतन मिळणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन वेळोवेळी सुधारित केले जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन आता ३.४ लाख रुपये प्रति महिना झाले आहे. राज्य विधिमंडळाने मुख्यमंत्र्यांसाठी पगारासह अनेक भत्ते निश्चित केले आहेत. यामध्ये महागाई तसेच इतर अनेक भत्त्यांचा समावेश आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांना निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आदी मोफत दिल्या जात आहेत.
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे सर्वाधिक वेतन
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे सर्वाधिक वेतन आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा ४.१० लाख रुपये दिले जातात. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ३.९० लाख रुपये मिळतात.
हरियाणा-बिहारसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन किती?
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना २.८८ लाख रुपये, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना २.५५ लाख रुपये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना २.३० लाख रुपये, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना २.२० लाख रुपये, २.१५ रुपये देण्यात आले आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांना लाख, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा २.१० लाख रुपये मिळतात.
इच्छुकांना लागली मंत्रिपदाची आस
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचेच दुसरे नेते, प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार १२ किंवा १३ डिसेंबर रोजी होईल, असे सांगितले आहे.
मंत्रिपदासाठी तीनही पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा
भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीनही पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे कोणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचे आणि कोणाला वगळायचे, असा पेच फडणवीस आणि शिंदे यांच्यापुढे आहे. नव्या सरकारमध्ये स्वच्छ चेहऱ्यांना प्राधान्य तसेच नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis: वडिलांना तुरूंगात टाकताच सोडली शाळा? काय आहे देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ किस्सा