Mumbai Drugs News: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ५१ कोटी ९४ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणात एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली असून, ही यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
हवाई गुप्तचर विभागाला एका परदेशी व्यक्तीकडून ड्रगची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर आज विमानतळावर सापळा रचून संशयित परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील साहित्याची झडती घेतली असता, चार बॉक्समधून, कमरेच्या पट्ट्यात आणि शर्टच्या कॉलरमध्ये लपवलेली पांढऱ्या रंगाची पावडर सापडली. सदर पावडरची तपासणी केली असता ती कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या कोकेनची बाजारमूल्य ५१ कोटी ९४ लाख रुपये इतकी आहे. या घटनेनंतर मुंबई विमानतळावर ड्रग तस्करी रोखण्यासाठी सुरक्षेचे उपाय आणखी कठोर करण्यात आले असून, संबंधित प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
Breaking News: आता मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
परदेशी नागरिकाकडून सापडलेले अंमली पदार्थ जप्त करत त्याला अटक कऱण्यात आली असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ (एनडीपीएस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी एका आंतरराष्ट्रीय टोळीसाठी आरोपी एका आंतराष्ट्रीय टोळीसाठी काम करत होता. त्याची चौकशी सुरू असून त्याच्यासोबत आणखी कुणी होते का, याचाही तपास केला जात आहे. या कामासाठी त्याला पैसेही मिळणार होते पण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. विमान प्रवासाचा खर्च आणि इतर खर्च मुख्य आरोपींकडून करण्यात आल्याचे त्याने चौंकशीत मान्य केलं आहे. याप्रकरणी सीमाशुल्क विभागातील अधिकारी अधिक तपास करीत आहे.
मंगळाच्या चालीने 5 राशींना होणार धनलाभ, 45 दिवसात जगाणार राजासारखे आयुष्य; होणार मालामाल
एका रिपोर्टनुसार, मुंबई आणि दिल्ली या देशातील प्रमुख महानगरांमध्ये कोकेनचा साठा तुलनात्मकदृष्ट्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. विशेषतः उच्चभ्रू तरुणांमध्ये कोकेनला सर्वात जास्त मागणी असते. दिवसेंदिवस ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्यामुळे हे चिंतेचे कारण बनले आहे. भारतात कोकेनची तस्करी दक्षिण अमेरिका व आफ्रिकन देशांमधून मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या काही वर्षांत मुंबई ही कोकेनच्या वितरणाचे केंद्रबिंदू म्हणून पाहिली जाते. यापूर्वी अंमली पदार्थ्यांच्या तस्करीसाठी आफ्रिकेतील गरीब देशांतील नागरिकांचा वापर केला जायचा. पण आता तस्करीसाठी बोलिव्हिया, व्हेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया आणि सुरीनाम या दक्षिण अमेरिकी देशांतील गरीब नागरिकही तस्करीसाठी वापरले जात आहेत.