मंगळ गोचराचा कोणत्या राशीवर होणार परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
७ जून रोजी मंगळ आपल्या कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल. हे संक्रमण अनेक राशींसाठी महत्त्वाचे ठरू शकते. मंगळ आपल्या कर्क राशीतून बाहेर पडताच, या लोकांच्या करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.
याचा सर्वात जास्त फायदा कोणत्या राशींना होईल आणि त्यांच्या आयुष्यात कोणते विशेष बदल येतील ते जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्र समीर मणेरीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. या यादीत तुमची रास आहे की नाही जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
मेष राशीवर कृपा
मेष राशीच्या व्यक्तींना मिळणार फळ
मंगळ तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि आता तो चौथ्या घरातून बाहेर पडून पाचव्या घरात प्रवेश करेल. हा काळ तुमच्यासाठी अनेक प्रकारे शुभ संकेत देत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. करिअरमध्ये नेतृत्वाच्या संधी मिळू शकतात. अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुम्ही जितके सक्रिय राहाल तितक्या लवकर तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. प्रेम जीवनात प्रणय आणि समजूतदारपणा वाढेल.
Bada Mangal: ज्येष्ठ महिन्यातील मोठा मंगळ, या दिवशी करा हे उपाय
मिथुन रास
मिथुन राशीच्या व्यक्तींची भरभराट
मंगळ तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात भ्रमण करेल, जे धैर्य, संवाद आणि प्रयत्नांचे घर आहे. तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढेल. तुम्हाला करिअरमध्ये चांगले परिणाम दिसतील. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. विचारांमध्ये स्पष्टता येईल, ज्यामुळे निर्णय घेणे सोपे होईल. मिथुन राशीची भरभराट होईल
तूळ रास
तूळ राशीच्या व्यक्तींचा होईल नफा
सिंह राशीत मंगळाचा प्रवेश तुमच्या अकराव्या भावाला सक्रिय करेल, जे नफा आणि आकांक्षांचे घर मानले जाते. आर्थिक लाभाचे अनेक स्रोत उघडू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे आता फळ मिळू लागेल. मोठे भाऊ-बहिण मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकतात. कामाचा वेग वाढेल आणि सहकारी तुमच्यावर प्रभावित होतील. काही लोकांना इच्छित नोकरी मिळण्याचे संकेत देखील मिळत आहेत.
वृश्चिक रास
कठीण काळ संपेल
तुमच्या राशीतून मंगळ दहाव्या घरात भ्रमण करेल, जिथे त्याला दिशात्मक शक्ती मिळते. हे करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेचे घर आहे. पदोन्नती आणि करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता प्रबळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हता आणि प्रभाव वाढेल. वडिलांसोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा शक्य आहे. तुमच्या भूतकाळातील चुकांमधून शिकून तुम्ही अधिक मजबूत व्हाल. यावेळी नशीब तुमच्या बाजूने असेल. आतापर्यंत जो कठीण काळ होतो त्यातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडू शकता
Surya Gochar: 15 जूनपासून या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, सूर्य बदलणार आपली राशी
मीन रास
मीन राशीसाठी ठरेल सकारात्मक
मीन राशीच्या लोकांसाठीही मंगळाचे हे भ्रमण सकारात्मक ठरू शकते. तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. तुम्ही प्रत्येक काम पूर्ण जबाबदारीने आणि समर्पणाने पूर्ण कराल, ज्यामुळे लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. तथापि, या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असेल.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.