PM Modi's visit to Mumbai (Photo Credit- X)
अलिबाग जिल्हा प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) हे दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईच्या (Mumabi) दौऱ्यावर येत आहेत. या महत्त्वाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कारणास्तव गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्गावरील सर्व प्रवासी बोटींची वाहतूक पूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांच्या दंगलगेट पोलीस ठाण्याने (Dangal Gate Police Station) जारी केलेल्या आदेशानुसार, पंतप्रधान मोदी हे राजभवन आणि ताज हॉटेल येथे भेट देणार आहेत. या ठिकाणांवरील सुरक्षेच्या दृष्टीने गेटवे परिसर आणि परिसरातील सागरी क्षेत्रात कडक सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या काळात गेटवे ऑफ इंडिया परिसरात कोणत्याही प्रवासी बोटी, फेरी सेवा किंवा जलवाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही.
PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?
या निर्णयामुळे गेटवे ते मांडवा, अलिबाग, मुरुड तसेच इतर किनारी भागांदरम्यानची फेरी सेवा पूर्ण दिवस ठप्प राहणार आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव लागू असलेल्या या बंदोबस्तात सहकार्य करावे आणि नियोजित बोट प्रवासाचे वेळापत्रक बदलावे. तसेच, अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी प्रवासाची पूर्वतयारी ठेवावी.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मुंबई भेटीदरम्यान “उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ” या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आभासी (Online) पद्धतीने होणार आहे. देशभरातील आयटीआय संस्थांमधून हा कार्यक्रम एकाचवेळी प्रसारित केला जाईल.
Devendra Fadnavis: हवालदिल बळीराजाला केंद्र मदत करणार; फडणवीस-मोदी भेटीत नेमके काय घडले?