सरकारी कामांमधील दिरंगाईची तक्रार थेट पंतप्रधान मोदी कार्यालयाकडे ऑनलाईन ऑफलाईफ स्वरुपामध्ये करता येणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
PMO Of India : नवी दिल्ली : सामान्य लोकांच्या अनेक प्रशासकीय समस्या असतात. यासाठी कोणाकडे जावे असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. सरकारी कार्यालयामध्ये त्यांच्या कामाला कोणी लगबगीने हात लावेल याची तर अपेक्षाच नसते. सरकारी कामांमध्ये होणाऱ्या दिरंगाईवर आणि इतर बाबींवर वचक बसवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. यापुढे कोणतीही समस्या आणि तक्रार सामान्य लोकांना थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करता येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे रीतसर तक्रार करता येणार असून यासाठी आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागणार आहे. यामुळे सरकारी काम आणि चार दिवस थांब ही परिस्थिती आता सुधारेल अशी आशा आहे.
सामान्य लोकांना यापुढे थेट पंतप्रधान कार्यालयाकडे(PMO) तक्रार करता येणार आहे. तप्रलंबित सरकारी काम अथवा तक्रार ऑनलाईन माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवता येणार आहे. पंतप्रधान कार्यालय नागरिकांना तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी विविध सुविधा देत आहे. त्याआधारे थेट पंतप्रधानांपर्यंत तक्रार करता येते. तुमच्या अडचणी आणि पिळवणूक याची माहिती देता येते. नाहक तुमची अडवणूक होत असेल तर त्याचीच तक्रार करता येते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अशी करा पंतप्रधानांकडे तक्रार
ऑनलाइन तक्रार दाखल कशी करायची?
ऑनलाईन तक्रार दाखल करायची नसेल तर पंतप्रधान कार्यालयाकडे लेखी तक्रार देखील दाखल करता येईल. टपाल कार्यालयाद्वारे, खासगी कुरियर अथवा फॅक्सचा वापर करुन संबंधित तक्रार दाखल करता येईल. तक्रारकर्ते पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली, पिन कोड 110011 या पत्त्याचा वापर करू शकता. तर फॅक्स करण्यासाठी, तुम्ही 01123016857 या फॅक्स क्रमांकाचा वापर करता येईल. तुम्ही थेट पंतप्रधान कार्यालयाच्या साउथ ब्लॉक, नवी दिल्ली येथील तक्रार पेटीचा वापर करू शकता.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तक्रारीवर प्रक्रिया कशी होणार?
नवी दिल्ली : सामान्य लोकांच्या अनेक प्रशासकीय समस्या असतात. यासाठी कोणाकडे जावे असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. सरकारी कार्यालयामध्ये त्यांच्या कामाला कोणी लगबगीने हात लावेल याची तर अपेक्षाच नसते. सरकारी कामांमध्ये होणाऱ्या दिरंगाईवर आणि इतर बाबींवर वचक बसवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. यापुढे कोणतीही समस्या आणि तक्रार सामान्य लोकांना थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करता येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे रीतसर तक्रार करता येणार असून यासाठी आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागणार आहे. यामुळे सरकारी काम आणि चार दिवस थांब ही परिस्थिती आता सुधारेल अशी आशा आहे.