मुंबई: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने (IIT Bombay) नुकतचं विद्यार्थ्यांसाठी वार्षिक प्लेसमेंट पार पडलं. या प्लेसमेंट दरम्यान, आयआयटीच्या विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या नोकऱ्यांच वेतन कोटींच्या घरात आहे. विद्यार्थांना सर्वोच्च वार्षिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वेतन अनुक्रमे 3.7 कोटी आणि 1.7 कोटी रुपये मिळालं आहे. गेल्या वर्षी सर्वोच्च वार्षिक आंतरराष्ट्रीय वेतन 2.1 कोटी रुपये (कमी) होतं, तर वार्षिक देशांतर्गत पगार 1.8 (जास्त) कोटी रुपये होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मिळालेल्या वेतनात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
[read_also content=”G20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेले ऋषी सुनक म्हणाले- ‘I am a Proud Hindu’, भारतातील मंदिरांना भेट देण्याची व्यक्त केली इच्छा! https://www.navarashtra.com/india/proud-hindu-rishi-sunak-hopes-he-can-visit-mandir-while-in-delhi-for-g20-nrps-455567.html”]
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मागील वर्षात नोंदवलेल्या आकडेवारीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या संख्येने नोकरी मिळाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत आयटी/सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकर भरती कमी होती. 2021-22 आणि 2020-21 मधील अनुक्रमे 21.5 लाख आणि 17.9 लाख रुपयांच्या तुलनेत कॅम्पसमधील या वर्षी विद्यार्थ्यांना मिळालेला पगार 21.8 लाख रुपये प्रतिवर्ष (CTC) आहे.
या वर्षी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराच्या 16 ऑफर देण्यात आल्या होत्या. आणि एकूण 300 प्री-प्लेसमेंट ऑफरपैकी, 194 विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या, ज्यात 65 आंतरराष्ट्रीय ऑफर आहेत. पण आंतरराष्ट्रीय ऑफर मागील वर्षीच्या तुलनेत कमी होत्या.
“या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय ऑफर यूएस, जपान, यूके, नेदरलँड्स, हाँगकाँग आणि तैवान येथील कंपन्यांनी केल्या होत्या. युक्रेनमधील युद्ध आणि दबलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेमुळे, आंतरराष्ट्रीय ऑफरची संख्या गेल्या वर्षी सारखीच होती,” असे सांगितले.
पहिला टप्पा डिसेंबरमध्ये आणि दुसरा जानेवारी आणि जून/जुलै दरम्यान. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्राने सर्वाधिक भरती केली – 458 ची निवड 97 कोर अभियांत्रिकी कंपन्यांनी प्रवेश-स्तरीय पदांवर केली; 302 विद्यार्थ्यांना 88 हून अधिक कंपन्यांनी IT/सॉफ्टवेअर नोकऱ्या देऊ केल्या आहेत, ज्यामुळे IT क्षेत्र अभियांत्रिकी नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रिक्रूटर्स बनले आहे. असे असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत आयटी आणि सॉफ्टवेअरची भरती कमी होती.
बी.टेक, ड्युअल डिग्री आणि एम.टेक प्रोग्राम्समधील विद्यार्थ्यांपैकी जवळपास 90% प्लेसमेंटमध्ये सहभागी झालेल्यांना नोकऱ्या मिळाल्या. एकूणच, प्लेसमेंट हंगाम 2022-23 मध्ये सक्रियपणे सहभागी झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी (1,845) 82% (1,516) विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. तसेच पीएचडीची झालेल्या केवळ 31% लोकांना नोकऱ्या मिळाल्या.