जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार
जलद देलासा मळणार
अंधेरी पश्चिम येथील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या टोकापासून ते जुहु-वेसावे जोड रस्त्यापर्यंत १ हजार ७५० मीटर (१.७५ किमी) लांबीचा आणि १५.१० मीटर रुंदीचा हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. प्रकल्पाची मूळ अंतिम मुदत ३१ मार्च २०२८ असली, तरी नागरिकांना जलद दिलासा मिळावा यासाठी कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.
अभियांत्रिकी आव्हाने आणि मेट्रोशी समन्वय
या प्रकल्पाच्या मार्गात भूगर्भातील महत्वाच्या पायाभूत सुविधांचे स्थलांतर करणे आणि मेट्रो मार्गिका २ बीच्या कामांशी ताळमेळ राखणे है मोठे आव्हान आहे. यामध्ये ६०० व ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांचे ४०० मीटरपर्यंत स्थलांतर, १२०० मिमी व्यासाच्या मलवाहिनीचे ‘मायक्रोटनेलिंग’ तंत्रज्ञानाद्वारे स्थलांतर आणि मैट्रो स्थानकाखाली आडव्या दिशेने गर्डर सरकवणे यांसारख्या गुंतागुंतीच्या कामाचा समावेश आहे. तसेच, ९० फूट जंक्शनवर ७मीटर लांबीचा कमानी पूल आणि जुहू सर्कल येथे कमी खांबांवर मोठे स्पॅन उभारले जाणा-आहेत. ही कामे विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी संपूर्ण प्रकल्पाची तीन टप्प्यांत विभागणी करून स्वतंत्र चमूंमार्फत समांतर पद्धतीने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाच चौकांतील कोंडीतून नागरिकांची सुटका
उड्डाणपुलामुळे जुहू सर्कलसह परिसरातील पाच प्रमुख वाहतूक जंक्शनवरील ताण पूर्णपणे दूर होणार आहे. प्रस्तावित वेसावे-वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई किनारा रस्ता (उत्तर) यांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा फायदा होईल, जुहू, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि वसौंवा परिसरातील अंतर्गत रस्ते वाहतूक गतिमान होण्यास मोठी मदत होणार आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






