Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक ड्युटी अन् वाहतुकीची दैना! ‘३१ डिसेंबर’प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा; शिक्षक संघटनेची मागणी

संघटनेने निवडणूक आयोग, राज्य सरकार, रेल्वे आणि परिवहन विभागाला पत्र लिहून खालील मागण्या केल्या आहेत. १४ आणि १५ जानेवारी रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत लोकल रेल्वे सेवा सुरू ठेवावी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 01, 2026 | 05:51 PM
'३१ डिसेंबर'प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा; शिक्षक संघटनेची मागणी (Photo Credit - X)

'३१ डिसेंबर'प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा; शिक्षक संघटनेची मागणी (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

  • निवडणूक ड्युटी अन् वाहतुकीची दैना!
  • ‘३१ डिसेंबर’प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा
  • शिक्षक संघटनेची मागणी
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांची वाहतुकीअभावी मोठी कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मध्यरात्री आणि पहाटे विशेष लोकल रेल्वे, बेस्ट बस आणि मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे.

नेमकी अडचण काय?

निवडणूक प्रक्रियेत मतदान साहित्याचे वाटप, ते जमा करणे आणि अंतिम अहवाल सादर करताना कर्मचाऱ्यांना मध्यरात्री १ ते २ वाजेपर्यंत काम करावे लागते. तसेच, मतदानाच्या दिवशी प्रक्रिया वेळेत सुरू करण्यासाठी पहाटे ५ वाजताच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असते. मात्र, या वेळेत मुंबईतील लोकल, बेस्ट आणि मेट्रो सेवा मर्यादित किंवा बंद असतात. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना केंद्रावर पोहोचणे किंवा घरी परतणे कठीण होणार आहे.

हे देखील वाचा: Pooja More : फडणवीसांविरोधात ते वक्तव्य भोवलं! भाजप उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून रडत रडत माघार

३१ डिसेंबरचा दाखला देत प्रशासनाला सवाल

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. “जर ३१ डिसेंबरच्या उत्सवासाठी प्रशासन मध्यरात्रीपर्यंत विशेष वाहतूक सेवा देऊ शकते, तर लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी (निवडणुकीसाठी) अशा सुविधा देणे का अडचणीचे ठरते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक प्रक्रिया रात्रंदिवस राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

संघटना काय मागण्या केल्या?

संघटनेने निवडणूक आयोग, राज्य सरकार, रेल्वे आणि परिवहन विभागाला पत्र लिहून खालील मागण्या केल्या आहेत. १४ आणि १५ जानेवारी रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत लोकल रेल्वे सेवा सुरू ठेवावी. १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी पहाटे लवकर रेल्वे फेऱ्या सुरू कराव्यात. याच कालावधीत बेस्ट बस आणि मुंबई मेट्रो सेवादेखील अधिक वेळ सुरू ठेवण्यात यावी. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या कार्यात कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने विशेष वाहतूक व्यवस्था जाहीर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

हे देखील वाचा: PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Web Title: Keep special local trains and best buses running for voting just like on december 31st demand from the teachers organization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • BMC
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ
1

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ

भाजप उमेदवाराचा नवा उपद्व्याप; मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना स्वतः करावी लागली आयोगाकडे तक्रार
2

भाजप उमेदवाराचा नवा उपद्व्याप; मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना स्वतः करावी लागली आयोगाकडे तक्रार

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान
3

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

Pooja More : फडणवीसांविरोधात ते वक्तव्य भोवलं! भाजप उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून रडत रडत माघार
4

Pooja More : फडणवीसांविरोधात ते वक्तव्य भोवलं! भाजप उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून रडत रडत माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.