Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai ला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर

Mumbai Bomb Threat: मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल मिळाला आहे. महापौर कार्यालय, मुंबईतील बँक, न्यायालय, अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2026 | 04:31 PM
मुंबईला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर

मुंबईला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर

Follow Us
Follow Us:
  • मुंबईला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी!
  • महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर
  • तपासणीत काय आढळलं?
 

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल पुन्हा एकदा मिळाला असून शहरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेला आठवडा उलटण्याआधीच गुरुवारी (१२ नोव्हेंबर) पुन्हा धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे.

कोणाला मिळाली धमकी?

मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या धमकीच्या ईमेलमध्ये मुंबई महापौर कार्यालय, शहरातील बँक, न्यायालय, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील जलसा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उल्लेख करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलमध्ये देण्यात आल्याचे समोर आले आहे.

Nagpur News : स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरला पुन्हा टॉप-३ मध्ये स्थान नाही; यंदा २२ व्या क्रमांकावरून सुधारणा की घसरण?

सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान…

विशेष म्हणजे, यापूर्वी प्राप्त झालेल्या धमकीच्या ईमेलमध्ये महापौर कार्यालय, न्यायालयाची इमारत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), वरळी रेसकोर्स आणि अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याचा उल्लेख करण्यात आला होता. आता पुन्हा अशाच स्वरूपाचा धमकीचा मेल आल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

नव्या धमकीच्या ईमेलमध्ये मुंबई महापालिकेचाही उल्लेख असल्याने पालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या. महापालिका परिसरात तपासणी सुरू करण्यात आली. ही तपासणी पूर्ण झाली असून, तेथे कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेबाबत यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. ईमेलचा स्रोत, धमकीमागील उद्देश आणि त्याची विश्वासार्हता याबाबत तपास सुरू आहे. वारंवार अशा प्रकारचे धमकीचे ईमेल येत असल्याने मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कोलकाता-मुंबई एअर इंडियाच्या विमानात अपहरणाची धमकी

कोलकाताहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या (AI 2772) विमानात अपहरणाची धमकी देणारी चिठ्ठी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी विमानाची कसून तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे या विमानाचे उड्डाण पुन्हा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रवाशांना पुन्हा विमानात बसवण्यात आले असून, हे विमान लवकरच मुंबईसाठी रवाना होणार आहे.

एअर इंडियाचे हे A320 विमान कोलकाताहून मुंबईला येत होते. विमानाचा नोंदणी क्रमांक VT-TNH आहे. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी केबिन क्रूला विमानातील वॉशरूममध्ये एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत विमान अपहरणाची धमकी देण्यात आल्याचे समोर आले. चिठ्ठी आढळताच केबिन क्रूने याची माहिती वैमानिकांना दिली. त्यानंतर वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) सतर्क केले. विमानतळ प्रशासनाने निर्धारित सुरक्षा प्रक्रियेनुसार (SOP) विमानाला कोलकाता विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये नेले.

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी कधी मिळाली?

    Ans: गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी मुंबईला बॉम्बने उडवण्याचा धमकीचा ईमेल प्राप्त झाला.

  • Que: धमकीच्या ईमेलमध्ये कोणत्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला?

    Ans: महापौर कार्यालय, मुंबईतील बँक, न्यायालय, अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उल्लेख करण्यात आला.

  • Que: धमकीनंतर तपासात काय आढळले?

    Ans: महापालिकेतील तपासणी पूर्ण झाली असून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Mumbai bomb threat email mayor office airport bmc security alert sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • BMC
  • Bomb threat
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL
1

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!
2

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!

Nashik Temple Threat : नाशिकमधील मंदिरांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या; भाविकांनी घाबरू नये, कालामंदीर पुजाऱ्यांचे आवाहन
3

Nashik Temple Threat : नाशिकमधील मंदिरांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या; भाविकांनी घाबरू नये, कालामंदीर पुजाऱ्यांचे आवाहन

Kasturba Hospital Mumbai: रुग्णालयाच्या आवारात ‘नवरंगा’ची हजेरी; कस्तुरबात दुर्मिळ इंडियन पिट्टाचे दर्शन!
4

Kasturba Hospital Mumbai: रुग्णालयाच्या आवारात ‘नवरंगा’ची हजेरी; कस्तुरबात दुर्मिळ इंडियन पिट्टाचे दर्शन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.