Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन

मुंबईतील गणेशोत्सवात दरवर्षी गणरायाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. यंदा कुर्ल्यातील एका सार्वजनिक गणेशोत्सवाने आपल्या अनोख्या मूर्तीमुळे भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आकाराने छोटी असली तरी या गणरायाचे रूप खास चर्चेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 22, 2026 | 08:40 AM
फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन

Follow Us
Follow Us:
  • कुर्ल्यातील गणेशोत्सवात साकारले गणरायाचे अनोखे रूप
  • शेषनागाच्या फण्याखाली विराजमान झालेला ‘लिटिल मास्टर’
  • अवघ्या १ इंचाच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता
कुर्ला पश्चिमेतील श्री ज्ञानदीप मित्र मंडळ, कुर्ला स्टेशनचा राजा यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा अनोखे आकर्षण ठरले आहे. मंडळाच्या ३९व्या वर्षानिमित्त यंदा अवघ्या १ इंचाच्या श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शेषनागाच्या भव्य फण्याखाली विराजमान असलेल्या या छोटेखानी गणरायाचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘लिटिल मास्टर शेषनाग गणेशा’ अशी या मूर्तीची ओळख असून, आकाराने अवघी १ इंचाची असली तरी भक्ती आणि महिमा अनंत असल्याचा संदेश मंडळाने दिला आहे. कुर्लेकर आणि गणेशभक्तांनी कुटुंबासह या अनोख्या गणरायाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Ganeshotsav 2026 : 22 वर्षांची श्रद्धा अन् परंपरा! ‘चेंबूरचा सम्राट’ गणेशोत्सवात नवगुंजराचे अद्भुत रूप ठरतेय आकर्षण

अध्यक्ष ईश्वर अहिरे यांचा कोट :

ईश्वर अहिरे, अध्यक्ष, श्री ज्ञानदीप मित्र मंडळ – “यंदा भक्तांसाठी काहीतरी वेगळं आणि अविस्मरणीय साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवघ्या १ इंचाच्या गणरायाचे हे अनोखे रूप म्हणजे आकाराने छोटे, पण भक्ती आणि श्रद्धेने विशाल असे श्रींचे दर्शन आहे. कुर्लेकरांसह मुंबईतील गणेशभक्तांनी कुटुंबासह या लिटिल मास्टर गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा.”

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

कार्याध्यक्ष धनंजय दळवी यांचा कोट :

धनंजय दळवी, कार्याध्यक्ष, श्री ज्ञानदीप मित्र मंडळ – “यंदाच्या गणेशोत्सवात कुर्लेकरांसाठी एक अनोखा आध्यात्मिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवघ्या १ इंचाच्या श्री गणरायाचे शेषनागाच्या फण्याखालील हे रूप भाविकांसाठी निश्चितच आकर्षणाचे ठरणार आहे. मूर्ती लहान असली तरी श्रींचे महत्त्व आणि भक्तीची भावना अनंत आहे. प्रत्येक गणेशभक्ताने कुटुंबासह या लिटिल मास्टर गणरायाचे दर्शन घ्यावे.”

पत्ता – नवी कंपाउंड, हरियाणावाला लेन, स्टेशन रोड, कुर्ला पश्चिम येथे गणेशभक्तांना या विशेष गणरायाचे दर्शन घेता येणार आहे.

 

Web Title: Kurla little master ganesha 1 inch ganpati idol under sheshnag hood mumbai ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganeshotsav 2026
  • kurla

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.