गणेशोत्सवात मुंबईकरांचा उत्साह शिगेला, पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दानपेटीत एवढी रक्कम जमा (फोटो सौजन्य - lalbaugcha raja)
Ganesh Chaturthi 2024: मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं तर डोळ्यासमोर येणारा पहिला गणपती म्हणजे लालबागचा राजा. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. मोठमोठे कलाकार, नेते मंडळी, लालबागच्या राजाच्या पायाशी लीन होतात. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी देखील भक्तांचा जनसागर उसळतो. यंदाच्या गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी देखील मोठ्या संख्येने भाविक राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते.
हेदेखील वाचा- Ganesh Chaturthi 2024: मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष, पाहा मुंबईतील गणपतींचे खास फोटो
पहिल्याच दिवशी भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी 48 लाख 30 हजार रुपयांचा नैवेद्य दाखवला. यासोबतच भक्तांकडून राजाला मोठ्या प्रमाणात सोने-चांदीही अर्पण करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी (8 सप्टेंबर 2024) रोजी भक्तांनी लालबागच्या राजाच्या चरणी 255.800 ग्रॅम सोने अर्पण केले आहे. यासोबतच 5024.000 ग्रॅम दान आलं आहे. पहिल्याच दिवशी दानपेटीची ही मोजणी सुरू आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी सांगितले की, गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला 48.30 लाख रुपयांची देणगी मिळाली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी (गणेश चतुर्थी उत्सव 2024) मिळालेल्या देणग्यांची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मोजणी करण्यात आली.विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याने लालबागच्या राजाला १५ कोटी रुपयांचा २० किलोचा सोन्याचा मुकुट भेट दिला होता.
हेदेखील वाचा- Ganeshostav 2024 : मराठी कलाकारांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन! पाहा काही खास फोटो
मुंबईत असलेल्या लालबागचा राजा म्हणजेच लाखो भाविकांच श्रध्दास्थान. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. लालबागच्या राजा म्हणजे नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ओळख आहे. श्रीगणेशाच्या या रूपाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. त्याच्या दारात येणारे भाविक मुक्तपणे देणगी देतात.
गणपतीचे भव्य रूप असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी करोडोंचा नैवेद्य अर्पण केला जातो. यामध्ये कोट्यवधींच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे. त्यांच्या या रूपाची स्थापना करण्याची परंपरा 1934 पासून सुरू आहे. या वर्षी लालबागच्या राजाच्या स्थापनेला 91 वर्षे पूर्ण झाली आहेत. लालबाच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक भाविक आतुर असतो.
यावेळी बाप्पाला 66 किलो सोन्याचे आणि 325 किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. याशिवाय 400 कोटी रुपयांचा विमाही काढण्यात आला आहे. गणेश महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईच्या लालबागच्या राजाची सर्वाधिक चर्चा राहिली आहे. हा उत्सव 10 दिवस चालतो. या वेळी शनिवारपासून (7 सप्टेंबर) गणेश चतुर्थीचा उत्सव सुरू झाला असून तो 17 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या दिवशी अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता होईल. विसर्जनाच्या वेळीही राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.