मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला अवघे चार दिवस राहिले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. निवडणुकीमुळे पोलिसांकडून ठिकठिकाणी चेकिंग पॉईट्स तयार कऱण्यात आले असून जोरदार तपासणी सुरू आहे. हे सुरू असतानाच मुंबई पोलिसांच्या हाती घबाड लागलं आहे.
मुंबई पोलिसांनी एका ट्रकमधून आठ हजार किलो चांदी जप्त केली असून, त्याची किंमत सुमारे 80 कोटी रुपये आहे. आयकर आणि निवडणूक आयोगाचे पथकाने ट्रक चालकाला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द पोलिसांनी वाशी चेकपोस्टजवळ नाकाबंदी केली होती. जिथून जाणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या वाहनाची झडती घेतली जात होती. तेवढ्यात एक ट्रक तिथून गेला आणि संशय आल्याने तो थांबला. पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रकची झडती घेतली असता सर्वांनाच धक्का बसला.
महाराष्ट्र निवडणूक: मतदान करा, ५० टक्के सूट मिळवा; ‘पाहिले न मी तुला’ नाटकाची खास ऑफर
ट्रकमागील फाटक उघडल्यावर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण संपूर्ण ट्रक चांदीने भरलेला होता. या चांदीचे वजन केले असता एकूण वजन 8,476 किलो असल्याचे आढळून आले. इतक्या चांदीची बाजारभाव अंदाजे 79 कोटी 78 लाख 21 हजार 972 रुपये आहे. एवढी मोठी चांदी पाहून पोलिसांनी तात्काळ चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
चांदी कोणाकडून व कोठून आणली याचा शोध घेण्यासाठी चालकाची चौकशी करण्यात येणार आहे. ते कोणाला आणि कुठे पोहोचवणार होते? आयकर आणि निवडणूक आयोगाची टीम या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. या चांदीची अवैध वाहतूक होत असल्याचा संशय प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात आला आहे. अवैध मालमत्तेची तस्करी केल्याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या चांदीची वैध कागदपत्रे सादर न केल्यास ती जप्त केली जाईल.
टीम इंडिया : टीम इंडियाला T20 संघात मिळाला विराट कोहलीचा रिप्लेसमेंट! कॅप्टन सूर्यकुमारने सांगित