फोटो सौजन्य सोशल मिडिया
Maharashtra FDA Raid : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्यात विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत एफडीएने मुंबईतील दहा आस्थापनांवर छापा टाकण्यात आला आहे. या छापेमारी मध्ये आस्थापनांचा परवाना आणि नोंदणीत त्रुटी दिसून आल्या आहेत. त्या सर्व आस्थापनांचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या छापेमारीत इस्लाम जिमखान्यातील हुमा कॅटरर, कांदिवलीतील मिल्कोज डेअरी प्रॉडक्ट्स, सांताक्रुझमधील ला पिनोझ पिझ्झा, विलेपार्लेतील एफथ्री कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, ऑपेरा हाऊसमधील नारायण डोसा, जे. जे. रुग्णालय परिसरातील सेंट्रल कॅण्टीन, चारकोपमधील पालीवाल डेअरी आणि मरीन लाइन्स परिसरातील नवाब ज्यूस सेंटर व अन्य दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे.
मुंबईतील कारवाई झालेली प्रमुख १० आस्थापणे: आणि ठिकाण
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) चे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अधिपत्याखाली राज्यभर सुरू असलेल्या मोहिमेत एफडीएच्या पथकाने 6 ते 8 ऑक्टोबरदरम्यान जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, कोकण विभाग, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या विविध जिह्यांतून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा व तीन वाहने असा एकूण 1.9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच बारा गुन्हे दाखल करत तेरा जणांना अटक केली आहे.






