'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर सरकारवर निशाणा साधला. ‘कुंभच्या नावाखाली हिंदू तूडवला जात आहे. दिल्ली रेल्वे चेंगराचेंगरी किंवा प्रयागराज असेल सरकार कुठे आहे?’, असेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा वापर केला. मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल. कारण दलित होता तो. संतोष देशमुखप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत का नाही लढाई केली? भाजप भ्रष्टाचार, बलात्कार, खुनाचं राजकारण करत आहे. तसेच मुंबई ‘न्यू इंडिया बँक’ लुटली. त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत’.
तसेच सगळे बिल्डर मेहता जैन आणि कदम भाजपचा आता कुठे गेले? हे मुलुंडचे पोपटलाल एवढी मोठी बँक लुटली गेली आता मुलुंडचा पोपटलाल कुठे लपला आहे? कोणत्या बिळात लपला आहे? आता का बोलत नाही? भारतीय जनता पक्षातील लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही का? गरिबांचा पैसा नाही? सामान्यांचा पैसा नाही? टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे, जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आता का तोंड बंद आहे?
आता ते इकडे का जात नाहीत? ईडीला का सांगत नाहीत? आता का पत्रकार परिषद घेत नाही? आता का तोंड बंद आहे? भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं. देवेंद्र फडणवीस यांनी याच उत्तर दिलं पाहिजे. कोणावर गुन्हा दाखल करत आहात? भाजप आणि आरएसएस संघाशी संबंधित आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय आणि विरोधी यांना वेगळा न्याय. कुंभच्या नावाखाली हिंदू तूडवला जातो, दिल्ली रेल्वे चेंगराचेंगरी किंवा प्रयागराज असेल सरकार कुठे आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला
ते पुढे म्हणाले, ‘सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी बीडमध्ये आंदोलन चालू केलं. एका कुणाला वाचा फुटले आणि खरे आरोपी आकाचा आका हे शब्द भारतीय जनता पार्टीने आणले, आम्ही आणले नाही. बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही. धस यांना तेव्हाच थांबवलं पाहिजे होतं, तेव्हा त्यांना बोंबाबोंब करायला दिली. बीडमध्ये वातावरण निर्मिती केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला’.