Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Updates: ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा; वसई रोडपासून गोरेगावपर्यंत तांत्रिक बिघाडांची मालिका

Mumbai Local Updates: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना लोकलच्या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड, दादर आणि गोरेगाव स्थानकांवर एकापाठोपाठ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली...

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 10, 2026 | 12:01 PM
ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा; वसई रोडपासून गोरेगावपर्यंत तांत्रिक बिघाडांची मालिका

ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा; वसई रोडपासून गोरेगावपर्यंत तांत्रिक बिघाडांची मालिका

Follow Us
Follow Us:
  • मुंबईकरांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेट मार्क!
  • वसई रोड, दादर, गोरेगावमध्ये तांत्रिक बिघाड
  • पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत
  • तीन स्थानकांवरील बिघाडामुळे प्रवाशांचे हाल
Mumbai Local Updates: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईची लाईफलाईन (Mumbai Local News Marathi) असलेल्या उपनगरीय लोकल सेवेवर तांत्रिक बिघाडांचे संकट ओढावले. सोमवारी सकाळच्या गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील तीन महत्त्वाच्या ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांसह हजारो प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागला.

पश्चिम रेल्वेवरील वसई रोड स्थानकात पहाटेपासूनच बिघाड झाला होता. पहाटे ४ वाजून ४६ मिनिटांपासून वसई रोड स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या बिघाडाचा परिणाम अप फास्ट लोकल वाहतुकीवर झाला. बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पॉइंट क्लॅम्पिंगचे काम हाती घेण्यात आले.

Exclusive: डोळे लाल भडक अन् महिलांचा पाठलाग…! रेल्वे स्थानकांवर महिला असुरक्षित? गैरवर्तनाचा धक्कादायक व्हिडीओ समोर

दरम्यान, वसई रोडवरील बिघाडाचे संकट कायम असतानाच दादर स्थानकात सकाळी १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. दादर हे पश्चिम रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे आणि वर्दळीचे स्थानक असल्याने या बिघाडाचा थेट परिणाम लोकल वाहतुकीवर झाला.

यानंतर अवघ्या काही मिनिटांतच गोरेगाव स्थानकातील हार्बर मार्गावरही तांत्रिक बिघाड झाला. सकाळी १० वाजून २२ मिनिटांच्या सुमारास पॉइंट क्रमांक १२७/१२८ आणि १२९/१३० मध्ये बिघाड झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण झाला.

Due to technical failures at multiple locations on the #suburban section, train services are currently affected.#localTrain #mumbaiLocal #WesternRailways pic.twitter.com/On4U20lXTQ — Priya Pandey (@priyapandey1999) August 10, 2026

स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक लोकल गाड्या विलंबाने धावू लागल्या. काही गाड्या मार्गातच खोळंबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. लोकल गाड्या साधारण १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. सकाळच्या पीक अवरमध्ये लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. वेळेत कार्यालयात पोहोचण्याची घाई असलेल्या नोकरदार प्रवाशांना या विलंबाचा सर्वाधिक फटका बसला.

रेल्वेचे तांत्रिक पथक घटनास्थळी

बिघाडाची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित यंत्रणांची तपासणी करून बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरात लवकर लोकल सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, मुंबईच्या लोकल सेवेत वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गर्दीच्या वेळेतच लोकल सेवा विस्कळीत होत असल्याने रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत

Web Title: Mumbai local train disruption western railway vasai road dadar goregaon technical fault

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Mumbai Local
  • Train
  • Western Railway

संबंधित बातम्या

Exclusive: डोळे लाल भडक अन् महिलांचा पाठलाग…! रेल्वे स्थानकांवर महिला असुरक्षित? गैरवर्तनाचा धक्कादायक व्हिडीओ समोर
1

Exclusive: डोळे लाल भडक अन् महिलांचा पाठलाग…! रेल्वे स्थानकांवर महिला असुरक्षित? गैरवर्तनाचा धक्कादायक व्हिडीओ समोर

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत
2

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत

Mumbai Local: ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात सापाची अफवा; 12 मिनिटे लोकल ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट
3

Mumbai Local: ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात सापाची अफवा; 12 मिनिटे लोकल ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव
4

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.