आपल्या पाण्याची चिंता मिटली?; राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली
मुंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या धरणांच्या पाण्यात प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. याबाबत मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या X अकाऊंटवर माहिती दिली आहे. महानगरपालिकेने मंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या धरणांची आकडेवारी जाहीर केली आहे. मुंबईत लागू करण्यात आलेली पाणीकपात 29 जुलैपासून बंद करण्यात आली आहे. तसेच आता मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
हेदेखील वाचा- हवामान विभागाने दिला मुसळधार पावसाचा इशारा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
मे महिन्यापासून मुंबईत पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र जून आणि जुलै महिन्यात मुंबईत दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या क्षमतेमध्ये वाढ झाली. त्यामुळे मुंबई महापालिकेने शहरात लागू करण्यात आलेली पाणीकपात बंद केली. आजच्या आकडेवारीनुसार मुंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपर्यंत भरला आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास ही सर्व धरणं 100 टक्के क्षमतेने भरतील.
महानगर पालिकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा –
हेदेखील वाचा- 7 वर्षे परफ्यूम वापरला पण सुगंधाने एकही तरूणी जवळ आली नाही; तरूणाची कोर्टात धाव
अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये 5 धरण आणि 2 तलाव आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तुलसी, विहार, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. आज ७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,०५,९४८ दशलक्ष लिटर इतका झाला आहे. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९०.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
मुंबईसह मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठा देखील 93.64 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला होता. पवना धरणातून मावळ तालुका आणि पिंपरी- चिंचवड शहराला पाणी पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणातून केला जाणारा विसर्ग आता थांबविण्यात आला आहे. पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने आता मावळ आणि पिंपरी चिंचवड तालुक्यातील नागरिकांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मागील २४ तासांत पवना धरण पाणलोट क्षेत्रात केवळ ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.