दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीविरोधात तरूणाची कोर्टात धाव (फोटो सौजन्य - istock)
प्रत्येक कंपनी त्यांच्या प्रोडक्टच्या मार्केटींगसाठी जाहीरात करत असते. काही कंपन्या या जाहीरातींना ग्राहकांच्या भावनांशी जोडतात. प्रत्येक ग्राहक जाहीरातीमध्ये दाखवण्यात आलेल्या चित्रानुसार त्या प्रोडक्टविषयी आपले मत तयार करतो. काही जाहीराती अत्यंत आकर्षित असतात. या जाहीराती पाहताच आरपल्याला ते प्रोडक्ट खरेदी करण्याची इच्छा होते. पण ही सर्व चित्रं केवळ जाहीरातींपुरतीच मर्यादीत असतात. जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरलेच असं नसतं. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या प्रोडक्ट्सची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी, अशा प्रकारच्या आकर्षित जाहिराती तयार करतात. पण यामुळे काहीवेळा ग्राहकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.
हेदेखील वाचा- पुढील 5 वर्षांत AI देणार कॅन्सरबाबत माहिती! उद्योगपती आनंद महिंद्रांचा मोठा दावा
आता अशीच एक घटना आता समोर आली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या एका ग्राहकाने तब्बल 7 वर्षे कंपनीचा एक्स परफ्यूम वापरला. परंतु जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे एकही तरूणी या तरूणाच्या जवळ आली नाही. यामुळे संतप्त ग्राहकाने हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली असून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या ग्राहकाने केली आहे. याबाबत उद्योगपती हर्ष गोयनका यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
हेदेखील वाचा- ‘हे’ आहेत जगातील कर्जबाजारी देश! भारताचा देखील समावेश आहे का, जाणून घ्या
एक्स परफ्युमची जाहिरात सगळ्यांनाच परिचित आहे. जाहिरातीमध्ये दाखवलं जातं की जेव्हा एखादा तरूण हा परफ्युम वापरतो, तेव्हा अनेक तरूणी त्याच्या जवळ येतात. हीच जाहिरात पाहून वैभव बेदी या तरूणाने हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीचा एक्स परफ्युम खरेदी केला. या तरूणाने हा परफ्युम तब्बल 7 वर्षे वापरला, मात्र तरी देखील एकही तरूणी त्याच्या जवळ आली नाही. जाहीरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात काहीही घडले नाही, यामुळे संतप्त तरूणाने कोर्टात धाव घेतली. या तरूणाने हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत उद्योगपती हर्ष गोयनका यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
Vaibhav Bedi sues HUL for cheating and causing mental suffering after using Axe products for over 7 years with no success in attracting women.
“Where is the Axe effect?” Vaibhav asks, even presenting his used products to court.
The most insane lawsuit ever? pic.twitter.com/QNqlMvDUmO
— Harsh Goenka (@hvgoenka) August 4, 2024
उद्योगपती हर्ष गोयनका यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, वैभव बेदी नावाच्या ग्राहकाने फसवणूक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. तरूणाने 7 वर्षे कंपनीचा एक्स परफ्युम वापरला. मात्र तरीही त्याला जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे परिणाम दिसले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या तरूणाने कोर्टात धाव घेत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडविरोधात खटला दाखल केला आहे. त्याने वापरलेले सर्व प्रोडक्ट्स वैभवने कोर्टात सादर केले आहेत. तसेच त्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
उद्योगपती हर्ष गोयनका यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, खूप चांगली गोष्ट घडली, देवाचे आभार, कोणीतरी सुरुवात केली. मी गेल्या १० वर्षांपासून हा परफ्युम वापरत आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात कडक कारवाई केली पाहिजे.