'मुख्यमंत्री योगींनी राजीनामा दिला नाही तर बाबा सिद्दीकीप्रमाणे...', मुंबई पोलिसांना आला धमकीचा मॅसेज
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 10 दिवसांत राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्री योगी यांची राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींप्रमाणे हत्या केली जाईल, असा धमकीचा मॅसेज मुंबई पोलिसांना आला आहे. या मॅसेजमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. या मॅसेजनंतर मुख्यमंत्री योगी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- Mahakumbh 2025: महाकुंभ 2025 मध्ये जगाला दिसणार चंद्रशेखर आझाद यांचे ‘बमतुल बुखारा’, कुंभमेळा ठरणार अनोखं आकर्षण
शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून मॅसेज आला. या मॅसेजमध्ये उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसांत राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींप्रमाणे हत्या केली जाईल, अशी धमकी देखील मॅसेजमध्ये देण्यात आली आहे. धमकीचा संदेश कोणी पाठवला याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (फोटो सौजन्य – pinterest)
या संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सुरक्षा दलाला माहिती देण्यात आली असून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. हा मॅसेज कोणी पाठवला, नंबर कोणाचा आहे, याबाबत तपास सुरु आहे. मात्र या मॅसेजनंतर मुख्यमंत्री योगी यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- Todays Gold Price: सोन्या चांदीचे भाव घसरले की वाढले? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. विजयादशमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.
बाबा सिद्दीकी यांची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली, तेव्हा फटाके फोडण्याचा आवाज सगळीकडे गुंजत होता. 1 गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली होती. त्यांना तातडीनं लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती. सलमान आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या कोणालाही आम्ही सोडणार नाही, त्यांचा हिशोब घेतला जाईल, असे या टोळीने मॅसेजमध्ये म्हटले होते.
बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक झाल्यानंतर काही दिवसांनी ही हत्या झाली आहे. संबंधित व्यक्तिने सलमानकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील आझम मोहम्मद मुस्तफा असे या व्यक्तीचे नाव असल्याचं सांगितलं जात आहे. सलमान खानसोबतच बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि वांद्रे पूर्व राष्ट्रवादीचे आमदार जीशान सिद्दीकी यांनाही धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी नोएडामध्ये एका 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.