Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट; कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा थरार; नागरिकांनी घेतला आक्रमक पवित्रा

कळंबोली“स्मशानातील राखही आता सुरक्षित नाही” या मथळ्याखाली दैनिक नवराष्ट्रमध्ये कळंबोली गावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकारासाठी राख चोरी होत असल्याचा संशय व्यक्त करणारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2026 | 03:33 PM
Navi Mumbai : नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट; कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा थरार; नागरिकांनी घेतला आक्रमक पवित्रा
Follow Us
Close
Follow Us:
  • नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट;
  • कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा थरार;
  • नागरिकांनी घेतला आक्रमक पवित्रा
पनवेल/ दीपक घरत : कळंबोली“स्मशानातील राखही आता सुरक्षित नाही” या मथळ्याखाली दैनिक नवराष्ट्रमध्ये कळंबोली गावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकारासाठी राख चोरी होत असल्याचा संशय व्यक्त करणारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीनंतर गावातील काही जागरूक नागरिकांनी दैनिक नवराष्ट्रशी संपर्क साधत स्मशानभूमीत अघोरी पद्धतीने पूजा केली जात असल्याची काही छायाचित्रे पुरवली आहेत.

नागरिकांनी उपलब्ध करून दिलेल्या या छायाचित्रांमध्ये स्मशानभूमी परिसरात संशयास्पद पद्धतीने पूजा साहित्य मांडलेले दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी राखेच्या ढिगाऱ्याजवळ विचित्र चिन्हे व साहित्य ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट दिसत असल्याने येथे अघोरी प्रकार घडत असल्याच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्ती स्मशानभूमीत येत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे स्मशानातील राख चोरी करून अघोरी विधी केले जात असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकाराची संबंधित प्रशासन आणि पोलीस विभागाने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसेच स्मशानभूमी परिसरात सुरक्षा व गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विरारमध्ये उभारणार १०० कोटींचे मँग्रोव्ह पार्क; वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

काय घडलं नेमकं ?
कळंबोली गावातील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर राहिलेली राख चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी घडत असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अघोरी कृत्यांचा संशयही व्यक्त केला जात होता. काही दिवसांपासून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर ठेवण्यात आलेली राख दुसऱ्या दिवशी अचानक गायब होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कोण करत आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला. स्थानिकांच्या मते, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्ती स्मशानभूमीत येऊन ही राख घेऊन जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती याबाबतच नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.

या प्रकारामुळे नागरिकांकडून अघोरी कृत्यांसाठी ही राख चोरी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र स्थळी घडणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. स्मशानभूमी परिसरात कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अशा प्रकारांना वाव मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. रात्रीच्या वेळी कोणीही सहजपणे येथे प्रवेश करू शकत असल्याने हा प्रकार घडत असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Navi Mumbai News : राख चोरीचा धक्कादायक प्रकार; स्मशानभूमीत घडतायत अघोरी कृत्य ? नवी मुंबईत चाललंय तरी काय ?

Web Title: Navi mumbai horror of heinous acts in kalamboli cemetery citizens take aggressive stance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.