आजपासून पुन्हा सुरू होणार नेरळ-माथेरान टॉय ट्रेन , जाणून घ्या टाइम टेबल आणि बुकिंग डिटेल्स
मुंबईत पावसाळा संपला असून हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. हवेत गारवा देखील जाणवू लागला आहे. हिवाळा सुरु झाला की पर्यटकांचा फार मोठं आकर्षण म्हणजे माथेरानची टेकडी. हिवाळ्यामध्ये माथेरानच्या टेकडीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. तुम्ही देखील या हिवाळ्यात माथेरानला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाळ्याच्या काळात बंद असणारी नेरळ-माथेरान टॉय ट्रेन आजपासून म्हणजेच 6 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु होत आहे.
हेदेखील वाचा- काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आज महाराष्ट्रात; सकाळी नागपुरात तर सायंकाळी मुंबईत सभा
माथेरानच्या टेकड्यांवर जाण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने 6 नोव्हेंबरपासून माथेरानसाठी पुन्हा टॉय ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात पाऊस आणि दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे माथेरान टॉय ट्रेन सेवा दरवर्षी पावसाळ्यात बंद केली जाते. टॉय ट्रेन पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना माथेरानला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. रेल्वेसेवा बंद असल्याने पर्यटक रस्त्याने माथेरानला पोहोचायचे. मात्र आता पर्यटक पुन्हा टॉय ट्रेनने नेरळ-माथेरान हा प्रवास पूर्ण करू शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)
52103 ट्रेन सकाळी 08.50 वाजता नेरळवरून निघते आणि 11.30 वाजता माथेरानला पोहोचते. तर 52105 ट्रेन सकाळी 10.25 वाजता नेरळवरून निघते आणि 13.05 वाजता माथेरानला पोहोचते. या दोन्ही ट्रेन नियमित आहेत.
52104 ट्रेन दुपारी 14.45 वाजता माथेरानरून निघते आणि 17.30 वाजता नेरळला पोहोचते. 52106 ट्रेन दुपारी 16.00 वाजता माथेरानरून निघते आणि 18.40 वाजता नेरळला पोहोचते. या दोन्ही ट्रेन नियमित आहेत.
हेदेखील वाचा- Meesho आणि Flipkart ने सुरू केली Lawrence Bishnoi ची प्रिंट असणाऱ्या टी शर्टची विक्री; उठली टीकेची झोड
52154 ट्रेन सकाळी 08.20 वाजता माथेरानरून निघते आणि 08.38 वाजता अमन लॉजला पोहोचते. 52156 ट्रेन सकाळी 09.10 वाजता माथेरानरून निघते आणि 09.28 वाजता अमन लॉजला पोहोचते. 52158 ट्रेन सकाळी 11.35 वाजता माथेरानरून निघते आणि 11.53 वाजता अमन लॉजला पोहोचते. 52160 ट्रेन दुपारी 14.00 वाजता माथेरानरून निघते आणि 14.18 वाजता अमन लॉजला पोहोचते. 52162 ट्रेन दुपारी 15.15 वाजता माथेरानरून निघते आणि 15.33 वाजता अमन लॉजला पोहोचते. 52164 ट्रेन दुपारी 17.20 वाजता माथेरानरून निघते आणि 17.38 वाजता अमन लॉजला पोहोचते.
माथेरानहून 10.05 वाजता प्रस्थान, 10.23 वाजता अमन लॉज येथे आगमन
माथेरानहून 13.10 वाजता प्रस्थान, 13.28 वाजता अमन लॉज येथे आगमन
52153 ट्रेन सकाळी 08.45 वाजता अमन लॉजहून निघते आणि 09.03 वाजता माथेरानला पोहोचते. 52155 ट्रेन सकाळी 09.35 वाजता अमन लॉजहून निघते आणि 09.53 वाजता माथेरानला पोहोचते. 52157 ट्रेन दुपारी 12.00 वाजता अमन लॉजहून निघते आणि 12.18 वाजता माथेरानला पोहोचते. 52159 ट्रेन दुपारी 14.25 वाजता अमन लॉजहून निघते आणि 14.43 वाजता माथेरानला पोहोचते. 52161 ट्रेन दुपारी 15.40 वाजता अमन लॉजहून निघते आणि 15.58 वाजता माथेरानला पोहोचते. 52163 ट्रेन संध्याकाळी 17.45 वाजता अमन लॉजहून निघते आणि 18.03 वाजता माथेरानला पोहोचते.
अमन लॉज 10.30 वाजता प्रस्थान,10.48 वाजता माथेरान आगमन
अमन लॉज 13.35 वाजता प्रस्थान, 13.53 वाजता माथेरान आगमन
टॉय ट्रेनच्या मार्गाचा काही भाग दर पावसाळ्यात बंद असतो, कारण पाण्याच्या प्रवाहामुळे या डोंगराळ रेल्वे मार्गावरील मातीची धूप होते. आता प्रथमच रेल्वेने जलवाहिन्या आणि बंधारे बांधण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. 21 किलोमीटर लांबीच्या डोंगरी रस्त्यावरील महत्त्वाच्या ठिकाणी हे काम केले जाणार आहे. रुळांवर साचलेली माती साफ करण्याचे काम आधीच सुरू झाले आहे.