Meesho आणि Flipkart ने सुरू केली Lawrence Bishnoi ची प्रिंट असणाऱ्या टी शर्टची विक्री; उठली टीकेची झोड
ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Meesho आणि Flipkart वर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोची प्रिंट असलेल्या टी-शर्टची विक्री सुरू करण्यात आली आहे. मात्र आता या टी शर्टच्या विक्रीबाबत त्यांना मोठा विरोध केला जात आहे. प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांपासून Meesho आणि Flipkart वर लॉरेन्स बिश्नोईची प्रिंट असणाऱ्या टी शर्टची विक्री सुरू झाली आहे. याबाबत दोन्ही प्लॅटफॉर्मना प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे.
हेदेखील वाचा- Wikipedia Controversy: केंद्र सरकारची विकिपीडियाला नोटीस, प्रकरण चुकीची माहिती देण्याशी संबंधित! वाचा सविस्तर
आता या प्रकरणावर Meesho ची प्रतिक्रियाही आली आहे. शॉपिंग प्लॅटफॉर्मने सांगितलं आहे, की प्लॅटफॉर्म वरून या टी शर्टचे उत्पादन काढून टाकण्यात आलं आहे. मात्र तरी देखील त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
Meesho आणि Flipkart या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले टी शर्ट विकले जात आहेत. लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले टी शर्ट विकल्याबद्दल या प्लॅटफॉर्मवर टीका होत आहे. यावर यूजर्सच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. युजर्सने म्हटलं आहे की असे करून हे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म गुन्हेगारांचा गौरव करत आहेत, जे पूर्णपणे चुकीचं आहे. Flipkart आणि Meesho वर सूचीबद्ध केलेल्या टी शर्टमध्ये, अशी अनेक उत्पादने होती जी लहान मुलांसाठी होती.
टी शर्टच्या विक्रीबाबत Meesho चे अधिकृत वक्तव्यही आलं आहे. अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, हे उत्पादन वेबसाइट आणि ॲपवरून काढून टाकण्यात आलं आहे. ‘आम्ही सुरक्षित आणि विश्वासार्ह खरेदी प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत’. या टी शर्टवर फक्त गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो नसून त्यावर गँगस्टर असं लिहिलेलं आहे. त्यांची किंमत 145 ते 200 रुपयांपर्यंत आहे.
हेदेखील वाचा- बनावट पेमेंट ॲप्सचा नवा ट्रेंड, व्यापाऱ्यांनी जागरूक राहणं गरजेचं! फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी वाचा टीप्स
Flipkart आणि Meesho ने ही उत्पादने काढून टाकली असली तरी सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. हे टी शर्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर 249 रुपयांना विकले जात आहेत. काही डिझाईन्समध्ये केशरी टी शर्ट आणि काळी हुडी घातलेली बिश्नोईच्या फोटोची प्रिंट आहे.
या प्रकरणी युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि असे टी शर्ट विकणे म्हणजे लहान मुले आणि सामान्य लोकांमध्ये गुंडांचा गौरव होत असल्याचे सांगत आहेत. एका युजरने लिहिले की, “Meesho आणि अशा प्रकारच्या इतर वेबसाइट्सना लाज वाटली पाहिजे!” दुसऱ्या युजरने लिहिले, “Meesho ला डी-प्लॅटफॉर्म केले पाहिजे,” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “म्हणून Meesho ला गुंड आवडतात आणि मुलांच्या कपड्यांवर त्यांचा प्रचार करते. व्वा!”
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हे अंडरवर्ल्डमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याच्या नावावर देशभरात खंडणी आणि खुनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अलीकडच्या काळात लॉरेन्स बिश्नोई टोळीने राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. याआधी 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्दू मूसेवालाच्या हत्येत या टोळीचा हात होता. याशिवाय अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे.