बिहार निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचा मास्टरप्लान; या मतदारांवर असणार विशेष लक्ष, भाजपचं टेन्शन वाढणार?
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यानुसार, प्रचारासाठी बड्या राजकीय दिग्गजांचे दौरे सुरू झाले आहेत. काँग्रेसचे स्टार प्रचारक व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारपासून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. राहुल गांधी यांचे सकाळी नागपुरात आगमन होणार आहे. यानंतर ते दुपारी 1 वाजता संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची बुधवारी सायंकाळी 5 वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी दुपारी 1 वाजता वाशिममधील उमेदवार श्याम रामचरण खोडे यांच्या निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत.
यानंतर दुपारी 3 वाजता तिवसा येथे महायुतीचे उमेदवार राजेश वानखेडे आणि सायंकाळी 5 वाजता मूर्तिजापूर येथे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या निवडणूक रॅलीत हजर राहणार आहेत.
रत्नागिरीत घेतली उद्धव ठाकरेंनी सभा
रत्नागिरीमध्ये मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सिंधुदुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोदींच्या अशुभ हाताने उभा केला होता जो आठ महिन्यात कोसळला. या पुतळा पडल्यानंतर मोदींनी माफीही गुर्मीत मागितली होती, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत केली.
उपमुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात सभा
कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आई तुझ्या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्हाला तुझा आशीर्वाद मिळू देत अशी प्रार्थना आम्ही करवीर निवासिनी महालक्ष्मीकडे केलेली आहे. महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या, छत्रपतींच्या इतिहासामध्ये सन्मान असलेल्या या कोल्हापूरमध्ये आम्ही प्रचाराची सुरुवात करत आहोत. या ठिकाणी सुरुवात केली, विजयच मिळतो, असा आम्हाला विश्वास आहे.
मतांसाठी किती लांगूनचालन करणार?
उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इंग्रजांवर राग होता, म्हणून त्यांनी सूरत लुटली असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता तुम्हाला औरंगजेबाचे नाव घेण्याची लाज वाटू लागली. मतांसाठी किती लांगूनचालन करणार? हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या नावातून तुम्ही हिंदूहृदयसम्राट काढून टाकले. उद्धवजी भारतातला राष्ट्रवादी मुसलमान आहे तो देखील औरंगजेबाला आपला नेता मानत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.