
पुलाच्या मधोमध ट्रेन पडली बंद, नेरुळ-उरण लोकल सेवा ठप्प, प्रवाशांची गैरसोय
हार्बर लाईनवरील नेरुळ-उरण लोकल सेवा जवळपास दोन तासापासून ठप्प झाली आहे. बेलापूर येथील रेतीबंदराजनजीक ही लोकल बंद पडली आहे. ब्रिजवर ट्रेन बंद पडली आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासून ही लोकल रेतीबंदर येथे उभी आहे. रेल्वे ट्रॅकमध्ये काही तांत्रिक बिघड झाल्यामुळे ही लोकल बंद असल्याचं सांगण्यात येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचे रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कामावरुन घरी निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र हाल होत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, ऐन पुलावर लोकल थांबल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झालेली दिसत आहे. काही प्रवाशांनी तर पायी आपल्या घराची वाट धरली आहे. पुलावर लोकल बंद पडल्याने बरेच प्रवाशी लोकलच्या खाली देखील उतरत नाही आहे.