फोटो सौजन्य सोशल मिडिया
दिल्ली येथे जंतर मंतरसमोर सुध्दा निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी आंदोलन सुरू असून मुंबई- पुण्यात सुध्दा आंदोलनाचे पडसाद पाहण्यास मिळत आहेत. आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि सिनेअभिनेते पाठींबा देताना दिसत आहेत.
कॅाक्रोच जनता पार्टीचे (CJP) चे आंदोलन मुंबई येथील आँगस्ट क्रांती मैदानाजवळ सुरू असून पुण्यातही कॅाक्रोच जनता पार्टीचे (CJP ) च्या समर्थनार्थ आंदोलन करताना पाहायला मिळाले. पुण्याच्या लष्कर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करताना विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली. या आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी होते.
Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
आज मुंबई मधील आँगस्ट क्रांती मैदान येथे कॅाक्रोच जनता पार्टीचे CJP चे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात बॅालीवूड अभिनेता इम्रान खान सहभागी झाला होता. माध्यमांशी बोलताना पोलिसांनी अभिनेता इम्रान खान याला ताब्यात घेतले.
आपल्या देशात इतक्या तैनात का आहेत? सरकार आंदोलनाला येणाऱ्या लोकांचे येणं जाण बंद करत आहेत, असा लोकांपासून काय धोका आहे. जे हे सरकार घाबरत आहेत. अशी स्पष्ट प्रतिक्रिया अभिनेता इम्रान खान याने दिली.
महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी यांना सुध्दा पोलिसांनी अटक केली असून शिवसेनेच्या उबाठा गटाने आणि मनसेने पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या मांडला आहे. जो पर्यंत तुषार गांधींना सोडत नाही; तो पर्यंत पोलीस स्थानकाजवळ बसून राहणार असे सांगण्यात येत आहेत. जर तुषार गांधी यांना सोडल नाही तर पुन्हा गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा






