Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज ठाकरे यांचा पाठिंबा; पण, एका अटीवर

मनसेचे वकील एसटी कामगारांसोबत राहतील. यापुढेही आम्ही त्यांच्यासोबत राहणार. पक्षही असेल आणि आमचे वकीलही राहतील. कायदेशीर लढाई सुरूच राहील. राज ठाकरे यांनी त्यांच्या भावना ऐकल्या. 28 २८ संघटनांनी हा संप जाहीर केला आहे. आता 1 लाख कर्मचारी संघटना बाजूला ठेवून एकत्रं आले आहेत. संघटनाविरहित लढाई लढत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. एसटी महामंडळाचं विलनीकरण करावं ही त्यांची मागणी आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 11, 2021 | 02:24 PM
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज ठाकरे यांचा पाठिंबा; पण, एका अटीवर
Follow Us
Close
Follow Us:

एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत संप मागे घेण्याचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. मात्र या साऱ्या गोंधळादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका मंडळाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी भेटीच्या सुरुवातीलाच आत्महत्या न करण्याची अट कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसमोर ठेवली.

या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीची माहिती दिली. एसटी कामगारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज्य सरकारशी चर्चा करण्याचं राज ठाकरे यांनी ठरवलं आहे. ते ताबडतोब सरकारशी बोलणार आहे. स्वत: राज ठाकरे जातीनिशी लक्ष घालून हा प्रश्न सोडवणार आहेत. एकदा सरकारशी बोलणं झालं की मग कामगारांशी बोलेन असं आश्वासन राज यांनी दिलं आहे, असं नांदगावकर यांनी सांगितलं. कोणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आपल्याला लढाई लढायची आहे. त्यासाठी आपल्या मनगटात रक्त आणि ताकद हवी. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडायचं नाही. मनसे या लढाईत सोबत राहील, असं आश्वासनही राज यांनी दिलं आहे. राज यांना सरकारमध्ये कोणाशी बोलायचं याची पुरेपूर कल्पना आहे. तेच बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्हालाही माहीत आहे ते कुणाशी बोलतील, असंही ते म्हणाले.

मनसेचे वकील एसटी कामगारांसोबत राहतील. यापुढेही आम्ही त्यांच्यासोबत राहणार. पक्षही असेल आणि आमचे वकीलही राहतील. कायदेशीर लढाई सुरूच राहील. राज ठाकरे यांनी त्यांच्या भावना ऐकल्या. 28 संघटनांनी हा संप जाहीर केला आहे. आता 1 लाख कर्मचारी संघटना बाजूला ठेवून एकत्रं आले आहेत. संघटनाविरहित लढाई लढत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. एसटी महामंडळाचं विलनीकरण करावं ही त्यांची मागणी आहे. राज्य सरकारला उच्च न्यायालयाने 12 आठवड्याची मुदत दिली आहे. समिती गठीत केली आहे. ही माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिली. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकरच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू केला तर पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. त्यानंतर विलनीकराची प्रक्रिया सुरू होईल असं या कामगारांचं म्हणणं असल्याचं नांदगावर म्हणाले.

Web Title: Raj thackerays support to msrtc workers strike but on one condition nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2021 | 02:24 PM

Topics:  

  • Worker Strike

संबंधित बातम्या

वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना पहिल्याच दिवशी मोठा फटका; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक 20 टक्के घटली
1

वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना पहिल्याच दिवशी मोठा फटका; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक 20 टक्के घटली

अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा संप तूर्त मागे; शासनाने उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल
2

अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा संप तूर्त मागे; शासनाने उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.