मुंबई : शिवजयंती उत्सव काही दिवसांवर आला आहे. राज्यात सगळीकडे शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सव साजरी करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही असे भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटले आहे. तसेच अटी कसल्या टाकतायत? हिंदूंचा उत्सव आला की लगेच नियम? असे प्रश्न ही उपस्थितीत करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शिवजयंती साजरी करण्यावरून भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारला सुनावलं. शिवजयंती साजरी करत असताना कोणत्याही जाचक अटी आम्ही जुमानणार नाही. असं राम कदम यांनी म्हटले आहे. शिवजयंतीचा उत्सव आम्ही धूम धडाक्यात साजरा करु असेही यांनी म्हटले आहे. हिंदूंचे सण किंवा उत्सव आले की महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार जागे होऊन कोरोनाच्या नावाखाली अटी घालते असाही घणाघात त्यांनी केला. तर, कोरोना सोबत कसं जगायचं, आमच्या जिवाची कशी काळजी घ्यायची हे प्रत्येक शिवरायांच्या मावळ्याला माहिती आहे या तिन्ही पक्षांनी आम्हाला शिकवायची गरज नाही असेही त्यांनी ठाकरे सरकारला सुनावलं.
#शिवजयंती साजरी करण्यात #ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही ..अटी कसल्या टाकताय ? #हिन्दूचा उत्सव आला की लगेचच नियम ? वा रे वा ! करायचे ते करा. #शिवजयंती उत्सव आम्ही धूम धडाक्यात करणारच .
— Ram Kadam (@ramkadam) February 14, 2022