देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; 17 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा
गेल्या आठवड्यापासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील १८ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. टीननुसार पाऊस राज्यातील विविध भागात हजेरी लावताना दिसून येत आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ तासांमध्ये मुंबईमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे .
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्याच्या इतर भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील २४ हे मुंबईसाठी महत्वाचे समजले जात आहेत. मुंबई आणि उपनगर भागात पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असे सांगण्यात आले आहे.
कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा व मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान विभागाने संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन सरकार व प्रशासनाने केले आहे.
राज्यात अनुकूल परिस्थिती असल्याने २५ ऑगस्टपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे शशराला पुढील तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस होत आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. ही राज्यासाठी सुखकारक बाब आहे.