Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंढेंना धक्का ! थेट मंत्रिमहोदयांनीच बदलला ‘तो’ निर्णय; कारवाईलाच स्थगिती

मंत्र्यांच्या कार्यालयात २४१८ अपील प्रलंबित या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. औषध विक्री परवान्यांशी संबंधित २४१८ अपील एफडीए मंत्र्यांच्या कार्यालयात बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 03, 2026 | 09:59 AM
तुकाराम मुंढेंना धक्का ! थेट मंत्रिमहोदयांनीच बदलला 'तो' निर्णय; कारवाईलाच स्थगिती

तुकाराम मुंढेंना धक्का ! थेट मंत्रिमहोदयांनीच बदलला 'तो' निर्णय; कारवाईलाच स्थगिती

Follow Us
Follow Us:
  • रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील मिथेनॉल रासायनिक कंपनीला राज्य सरकारकडून दिलासा मिळाला आहे.
  • अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीचा परवाना रद्द केला होता.
  • पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली होती.

मुंबई : भेसळ, अवैध रासायनिक कारखाने आणि ड्रगमाफिया यांच्यावर कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांना त्यांच्याच विभागाच्या मंत्र्यांकडून धक्का बसला आहे. पुणे विषारी दारूच्या दुर्घटनेनंतर, मुंडे यांनी रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील एका मिथेनॉल रासायनिक कंपनीचा परवाना रद्द केला होता. मात्र, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या कारवाईला स्थगिती दिली आणि कंपनीचा रद्द केलेला परवाना पुनर्स्थापित केला. या निर्णयामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

संबंधित कंपनीचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रभावशाली नेत्याच्या जवळच्या लोकांशी असल्याचा आरोप आहे. परिणामी, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या दबावाखाली मंत्र्यांनी मुंढे यांची कारवाई थांबवली. तुकाराम मुंडे यांनी एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून, विभागाने कारवाईला गती दिली आहे. विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारींच्या संख्येत ५५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विभागाने भेसळयुक्त गूळ, जिलेबीमधील कृत्रिम रंग, दुधातील भेसळ आणि खाद्यपदार्थांमध्ये विषारी घटकांचा वापर यांविरुद्ध छापे टाकले आहेत.

मंत्र्यांच्या कार्यालयात २४१८ अपील प्रलंबित या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. औषध विक्री परवान्यांशी संबंधित २४१८ अपील एफडीए मंत्र्यांच्या कार्यालयात बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत. परिणामी, रांजणगाव कंपनीला दिलेल्या तत्काळ दिलासामुळे निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोणत्याही राजकीय नेत्याचा दबाव नसतो

या वादानंतर, झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, सुनावणी घेताना किंवा निर्णय घेताना त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाचा किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचा दबाव नसतो. मात्र, मंत्री झिरवाळ यांनी कोणताही राजकीय दबाव आल्याचे नाकारले आहे. या २२ कंपन्यांमध्ये पुण्यातील रांजणगाव येथील एका मिथेनॉल कंपनीचा समावेश होता. ही कंपनी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तींशी संबंधित आहे.

FAQ

प्र.1. रांजणगावमधील कोणत्या कंपनीला दिलासा मिळाला आहे?

उत्तर: रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील मिथेनॉल रासायनिक कंपनीला दिलासा मिळाला आहे.

प्र.2. कंपनीचा परवाना कोणी रद्द केला होता?

उत्तर: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीचा परवाना रद्द केला होता.

प्र.3. कंपनीच्या परवान्यावरील कारवाईला कोणी स्थगिती दिली?

उत्तर: अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कारवाईला स्थगिती दिली.

Web Title: Relief for ranjangaon based methanol company from minister narhari zirwal nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • FDA
  • Tukaram Mundhe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.