हे सगळं कुणीतरी रचतंय! माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवर जयंत पाटलांना वेगळाच संशय
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बहुतेक सर्वच पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे वारे वाहत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा गटही त्यास अपवाद राहिलेला नाही. त्यांच्या पक्षाकडूनही आता मागणीला जोर दिला जात आहे.
सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. असे असतानाच नव्या तरुण रक्ताला संधी द्या, पक्षाला वेळ देईल असा प्रदेशाध्यक्ष निवडा, अशी मागणी करण्यात आली आहे. पवार गटाच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्याच व्यापक बैठकीतील एका कार्यकर्त्याचे भाषण व्हायरल होत असून, त्यात ही मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष मराठा समाजातील नको, असेही या कार्यकर्त्याने म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि पर्यायाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर पक्षाची पहिलीच महत्त्वाची बैठक मुंबईत होत आहे.
सर्वांचे राजीनामे घ्या, तरुणाईला संधी द्या
सर्वांचे राजीनामे घ्या आणि तरुणांना संधी द्या. प्रदेशाध्यक्षापासून सर्व बदला. सामान्य कार्यकर्त्यांना भेटेल, अशा बिगरमराठा तरुण नेत्याला संधी द्या. राज्यात वेगळे वातावरण चालू आहे, आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल तर पक्षासाठी वेळ देऊ शकेल अशा कार्यकर्त्याला अध्यक्षपदी संधी द्या. याचा अर्थ जयंत पाटील वेळ देत नव्हते असा नाही. पण, नवीन तरुणांना संधी द्या, अशी विनंती करतो, असे एका कार्यकर्त्याने सांगितले.
शरद पवार यांच्या पक्षात, गेल्या काही दिवसांपासून काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही अनेकांची नाराजी आहे. त्यामुळे पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये स्थानिक नेत्यांच्या सूचना दुर्लक्षित केल्याचा आरोप होत आहे. निवड समितीकडून आलेल्या काही नावांवर फुली मारल्यामुळे नाराजी वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत 8 जागांवर विजय
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० जागांवर लढत ८ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. पवार गटाने ८६ जागांवर उमेदवार उभे केले होते, पण फक्त १० जागांवरच विजय मिळवता आला. विधानसभा निवडणुकीतील या अपयशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे, आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या शक्यतेची चर्चा सुरु आहे.