
Shivsena Thackeray group claims that Mohit Kamboj is BJP's Mumbai mayoral candidate
Mohit Kamboj : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. . राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदान 15 जानेवारीला पार पडेल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. देशाची अर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. मुंबईमध्ये सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने मनसेला हाताशी धरले आहे. तर भाजपने राष्ट्रवादीला बाहेर काढत शिंदेंना सोबत ठेवले आहे. यामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार मोहित कंबोज असल्याचा दावा केला आहे.
मुंबईचा महापौर मराठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत भाजपने मुंबईचा महापौर हिंदू असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी भाजपवर निशाणा साधत थेट उमेदवाराचे नाव जाहीर केले. अखिल चित्रे यांनी लिहिले आहे की, भाजपाने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले… त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजपा नेत्यांना विचारतात कि, “मुंबईचा महापौर मराठी असेल का?” त्यावर फडणवीस म्हणतात, “महापौर महायुतीचाच होणार…”असा टोला चित्रे यांनी दावा केला.
हे देखील वाचा : ठाकरे गट-मनसेची जागावाटपाची चर्चा पूर्ण; दादर, शिवडी, भांडूप, विक्रोळी प्रभागांवरील वाद मिटले
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “शेलार म्हणतात, “महापौर हिंदू होणार…” पण कुणीही छातीठोकपणे सांगत नाही कि, महापौर मराठीच होणार ! ह्याचाच अर्थ त्यांचा मुंबई ‘महापौर’पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय…मोहित कंबोज ठरलाय ! मराठी माणसा, आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का? धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल पण स्वाभिमानी मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा !” अशा शब्दांत ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी दावा केला आहे.
भाजपाने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले… त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजपा नेत्यांना विचारतात कि, “मुंबईचा महापौर मराठी असेल का?” त्यावर फडणवीस म्हणतात, “महापौर महायुतीचाच होणार…”
शेलार म्हणतात, “महापौर हिंदू होणार…”
पण कुणीही छातीठोकपणे… pic.twitter.com/HQs9iMijg5 — Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 21, 2025
हे देखील वाचा : भाजप आमदारांना कसला माज? मुंबईमध्ये रिक्षा चालकाला मारहाण, ठाकरे गट आक्रमक