घाटकोपरमध्ये आमदार पराग शाह रिक्षा चालकाला मारहाण केली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवर बस्तान मांडणाऱ्या दुकानदार तसेच अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आमदार पराग शाह यांनी घाटकोपर येथे आंदोलन केलं होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. भाजप आमदार पराग शाह यांनी एका रिक्षा चालकाला मारहाण केली. रिक्षा चालकाने वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पराग शाह यांचा राग अनावर झाला. मात्र रिक्षा चालकाने नियम मोडले असले तरी त्याच्यावर अशा पद्धतीने हात उचलणं आणि कायदा हातामध्ये योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे देखील वाचा : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा
मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथांवर अतिक्रमण होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. वल्लभबाग लेन आणि खौगली भागात अनेक दुकानदारांनी पदपथावर खुर्च्या आणि बाकडे ठेवून अतिक्रमण केलं होतं. त्यानंतर भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांनी या भागाला भेट दिली. पराग शाहांच्या या भेटीदरम्यान, महात्मा गांधी मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत, चुकीच्या दिशेने गाडी चालवत एक रिक्षा चालक आला. त्या वेळी पराग शाह यांनी त्या रिक्षा चालकाला मारहाण केली.
“BJP MLA Slapped an Auto Driver.” 🚨 A video of BJP’s MLA Parag Shah went viral after he slapped an Auto-Rickshaw driver in Ghatkopar, Maharashtra. Utterly shameful! This is how the BJP treats common people. pic.twitter.com/ACtPwmTPZ7 — Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) December 21, 2025
हे देखील वाचा : महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले…
खासदार संजय राऊत यांनी या मराठी रिक्षाचालकाला केलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपचे आमदार पराग शाह हे रस्त्यावर उतरुन एका मराठी रिक्षावाल्याला मारतात. तो रिक्षावाला चुकला असेल, त्याने नियम मोडला असेल. पण भाजपचे सरकार रोज नियम मोडत आहे. भाजपने नियमबाह्य पद्धतीने मुंबई अदानीला देऊन टाकली. मग पराग शाह जाऊन अदानींची कॉलर पकडणार आहेत का, त्यांच्यात एवढी हिंमत आहे का? पराग शाह हे देवेंद्र फडणवीसांना मिठागाराची आणि धारावीची जमीन अदानींना दिल्याबद्दल जाब विचारणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.






