Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shraddha Walkar : प्रियकराकडून लेकीचे ३५ तुकडे, हत्येनं खचलेल्या वडिलांचं निधन; ‘ती’ अखेरची इच्छा राहिली अधुरी

१८ मे २०२२, संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली होती. २७ वर्षीय श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराने अतिशय विकृत पद्धतीने हत्या केली होती. घटनेचं वृत्त ऐकून श्रद्धाच्या कुटुंबाला धक्का बसला होता.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 09, 2025 | 04:06 PM
प्रियकराकडून लेकीचे ३५ तुकडे, हत्येनं खचलेल्या वडिलांचं निधन; 'ती' अखेरची इच्छा राहिली अधुरी

प्रियकराकडून लेकीचे ३५ तुकडे, हत्येनं खचलेल्या वडिलांचं निधन; 'ती' अखेरची इच्छा राहिली अधुरी

Follow Us
Close
Follow Us:

१८ मे २०२२, संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली होती. २७ वर्षीय श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराने अतिशय विकृत पद्धतीने हत्या केली होती. घटनेचं वृत्त ऐकून श्रद्धाच्या कुटुंबाला धक्का बसला होता. दरम्यान मुलीच्या हत्येने खचलेल्या विकास वालकर यांचं मुंबईत हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं.दिल्लीच्या महरोली परिसरातील घरात श्रद्धाचा प्रियकर आणि लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पुनावालानं तिची हत्या केली होती.

मुलीच्या हत्येनंतर विकास वालकर यांना मानसिक धक्का बसला होता. मुलीच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांची प्रतीक्षा सुरु होती. पण श्रद्धाच्या मृतदेहांचे अवशेष पोलीस तपासातील पुरावा असल्याने विकास वालकर यांना अवशेष मिळाले नाहीत. त्यामुळे मुलीच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याची त्यांची इच्छा अधुरीच राहिली. श्रद्धाच्या हत्येचा उलगडा तब्बल ६ महिन्यांनंतर झाला.

आफताबने तिची हत्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले आणि नंतर पोलिसांना चकमा देण्यासाठी तो अनेक दिवस दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात मृतदेहाचे तुकडे फेकत राहिला. नंतर जंगलातून काही शरीराचे अवयव सापडले. नोव्हेंबर २०२४ मध्ये, दिल्लीच्या तिहार तुरुंग अधिकाऱ्यांनी आरोपी आफताब पूनावालाला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेची स्थिती तपासली.

चौकशीदरम्यान, सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवाने खुलासा केला की, बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकरने आफताब पूनावालावर हल्ला करण्याचा कट रचला होता. तथापि, कडक सुरक्षेमुळे टोळीने त्याच्यावर हल्ला न करण्याचा निर्णय घेतला. श्रद्धा आणि पूनावाला लग्न करण्यापूर्वी तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

श्रद्धाच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं. २०१९ मध्ये जेव्हा कुटुंबाने श्रद्धाच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या निर्णयाला विरोध केला तेव्हा तिने सांगितले की ती २५ वर्षांची आहे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम आहे. तिने तिच्या वडिलांना ती आता त्यांची मुलगी नाही हे मान्य करण्यास सांगितले. श्रद्धा २८ वर्षीय आरोपी पूनावालासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही प्रथम वसईमध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि तेथून दिल्लीला गेले, जिथे श्रद्धाची आरोपींनी हत्या केली.

 

Web Title: Shraddha walkar father vikas walkar dead due to heart attack marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Mumbai Crime
  • Mumbai Police news
  • Shraddha walkar case

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ट्रान्सजेंडर गटाकडून 19 वर्षीय तरुणाचं अपहरण, जबरदस्तीने जेंडर सर्जरीचा धक्कादायक आरोप; मालाड येथील प्रकार
1

Mumbai Crime: ट्रान्सजेंडर गटाकडून 19 वर्षीय तरुणाचं अपहरण, जबरदस्तीने जेंडर सर्जरीचा धक्कादायक आरोप; मालाड येथील प्रकार

Mumbai Crime: भायखळ्यात दुर्दैवी अपघात! निर्माणधीन इमारतीत मातीखाली दबून दोन कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
2

Mumbai Crime: भायखळ्यात दुर्दैवी अपघात! निर्माणधीन इमारतीत मातीखाली दबून दोन कामगारांचा मृत्यू, ३ जखमी

Mumbai Crime: सहा महिन्यांनंतर अपहृत चिमुकलीचा शोध! CSMT वरून झालं होत अपहरण, वाराणसीतून पोलिसांनी केली सुटका
3

Mumbai Crime: सहा महिन्यांनंतर अपहृत चिमुकलीचा शोध! CSMT वरून झालं होत अपहरण, वाराणसीतून पोलिसांनी केली सुटका

Mumbai Crime: दुर्दैवी! मुंबईत उंच इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू
4

Mumbai Crime: दुर्दैवी! मुंबईत उंच इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.