फोटो सौजन्य सोशल मिडिया
Sion Hospital Case : सायन रुग्णालयात शिवचरण आप्पा पाटील या वैद्यकीय डॅाक्टरने आत्महत्या केली आहे. ॲनास्थेशियाचा ओव्हरडोस घेवून आत्महत्या केल्याचा संशय समोर येत आहे. डॅक्टर शिवचरण आप्पा पाटील याने हॅास्पिटलच्या होस्टेलमधील त्याच्या राहत्या खोलीत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असून त्याचा मृत देह बाथरूम मध्ये काल रात्री सापडला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
निवासी डॅाक्टरांच्या आत्महत्ये मुळे सायन हॅास्पिटल मध्ये सध्या खळबळ उडाली आहे. याआधी सुद्धा जे.जे. हॅास्पिटलच्या एका डॅाक्टरने आत्महत्या केली होती. आता सायन हॅास्पिटल मधील डॅाक्टराच्या आत्महत्येमुळे सायन हॅस्पिटल मध्ये खळबळ उडाली असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
ॲनास्थेशियाचा ओव्हरडोस घेवून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्या केलेल्या निवासी डॅाक्टर शिवचरण आप्पा पाटील हा सर्जरी विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत होता.
निवासी डॅाक्टराच्या आत्महत्येमुळे सायन हॅास्पिटल मध्ये आता भितीचे वातावरण आहे. निवासी डॅाक्टर शिवचरण आप्पा पाटील याच्या आत्महत्येमुळे निवासी डॅाक्टरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस याघटनेचा तपास करत आहेत. रुग्णालयातील निवासी डॅाक्टकरांची आत्महत्या होणं ही एक चिंता जनकबाब असून ही आत्महत्या आहे; की घातपात असा अंदाज वर्तवला जात आहे.पण प्राथमिक माहिती नुसार ही आत्महत्याचं असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुंबई पोलिसांच्या थमिक माहिती नुसार आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन ) डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले की, रुग्णालय प्रशासनातर्फे या घटनेची अंतर्गत चौकशी केली जाईल आणि पोलीस तपासातूनच या आत्महत्येमागील नेमके कारण काय ते स्पष्ट होईल.
ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त






