'तरुणांना दर महिन्याला 8500 रुपये दिले जाणार'; काँग्रेसकडून मोठी घोषणा
मुंबई : शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा आधार घेत स्वबळावर निवडणुका लढण्याबाबत सूचक विधान केले आहे.
हेदेखील वाचा : Walmik Karad News: वाल्मिक कराडकडून 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा; पंढरपूरच्या शेतकऱ्याचा गौप्यस्फोट
काँग्रेस कार्यकर्त्यांचा आवाज ऐकणे आणि त्यांना संधी देणे ही पक्षाची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढावे. त्यांच्या मागणीनुसार आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ, असे गायकवाड म्हणाल्या.
महाविकास आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता
वर्षा गायकवाड यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे आणि काँग्रेसकडूनही असे संकेत आल्याने आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कार्यकर्त्यांचा आग्रह महत्त्वाचा
गायकवाड यांनी स्पष्ट केले की, “कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी संधी हवी आहे. मोठ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना नेहमीच संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय घेतला जाईल”.
आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू : वडेट्टीवार
संजय राऊत यांच्या ‘एकला चलो रे’मुळे काँग्रेस नेते बॅकफूटवर आले असून, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. संजय राऊत मोठे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली असली तरीही आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. आपण एकत्र लढू अशी त्यांना विनंती करू. ते सोबत नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : ‘तुम्ही जाळात हात घालू नका’; संतोष देशमुख हत्येप्रकरणावर जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा