वाल्मिक कराडचा आणखी एक क्रूर चेहरा उघड; मुंडे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शीचाही खून (Photo Credit- Social Media)
सोलापूर: बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारने या प्रकरणातील आठ आरोपींवर महाराष्ट्र कन्ट्रोल ऑफ ऑरगनाईज्ड क्राईम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर, या प्रकरणातील सर्व आरोपींवर विशेष न्यायालयात खटला चालवण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. तसेच खंडणी प्रकरणात सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.अशातच वाल्मिक कराडबद्दल आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आहे, असे आरोप करण्यात आले आहेत. सध्या कराड एका खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असून दिवसेंदिवस त्याचे प्रताप समोर येत आहे. अशातच पंढरपूरच्या एका शेतकऱ्याने वाल्मिक कराडबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. पंढरपूर येथील शेतकऱ्यांनी दिलीप नागणे यांच्यावतीने एक मोठा आरोप केला आहे.
नेटकऱ्यांना ट्रेंड करायला भाग पाडणार पुष्कर जोग आणि पूजा राठोड यांचं ‘बायडी’ गाणं,
वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. कराडने हार्वेस्टिंग मशीनला प्रत्येकी 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतो असे सांगून शेतकऱ्यांकडून 8 लाख रुपये घेतले होते. यावरून शेतकऱ्यांनी पैसे एकत्र करून मुंबईतील विश्रामगृहात कराड यांना देणगी दिली. पण पैसे दिलेल्यांपैकी एकाही शेतकऱ्याला अनुदान मिळाले नाही. जेव्हा शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मागितले, तेव्हा त्यांनी कराडला पैसे परत मागितले. यावरून कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बीडला बोलावून शेतकऱ्यांना मारहाण केली, असे दिलीप नागणे यांनी सांगितले.
सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि अहिल्यानगर येथील ऊस तोडणी यंत्र मालकांची फसवणूक करण्यात आली आहे. कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती, पण त्याच्या अटकेनंतर आता हे शेतकरी तक्रार देण्यासाठी पुढे येऊ शकतात, अशी शक्यता नागणे यांनी व्यक्त केली.
मार्क झुकरबर्गने मेटाच्या कार्यालयात दिला ‘असा’ आदेश; LGBTQ समुदायाने काढला मोर्चा
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या मॅनेजरने गंभीर आरोप केले आहेत. सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीनेच सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे.
सुशील कराडचे साथीदार अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरूद्धही खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पिडीत मॅनेजरच्या पत्नीने सुशील कराडसह त्याच्या दोन्ही साथीदारांविरोधात सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली होती. पण त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही, अशीही माहिती समोर आली आहे.
मार्क झुकरबर्गने मेटाच्या कार्यालयात दिला ‘असा’ आदेश; LGBTQ समुदायाने काढला मोर्चा
वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळयानंतर पिडीत मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करत या तिघांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मॅनेजरच्या पत्नीने केलेल्या आरोपांवर आरोपींनीही त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. 13 जानेवारीला याप्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुशील कराडवर केलेल्या आरोपांबाबत न्यायालय काय निर्णय देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.