Photo Credit- Social Media 'नागपूर दंगल फडणवीस पुरस्कृत', मनोज जरांगेंचा थेट आरोप
जालना : गेल्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरु आहे. अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या झाल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या हत्येप्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचेही नाव घेतले जात आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठं विधान केले आहे. ‘तुम्ही असाच त्रास देत राहिलात, तर मराठ्यांना उठाव करावा लागेल’, असे त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : नवीन व्हायरसचा धोका असताना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना ताळे; तात्काळ सुरु करण्याची रोहन सुरवसे पाटील यांची मागणी
मागील महिन्यात 9 डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधी आवाज उठवत होते. त्यानंतर धाराशिवमध्ये संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
या मोर्चात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. ते म्हणाले, ‘धनंजय मुंडे त्याच्या गुंडांच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे. सगळं पाप झाकण्यासाठी ओबीसींचं पांघरून घेत आहेत. यात ओबीसींचा काय संबंध? संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखला तुम्ही धमकी देता. आम्ही गुंडाला बोलायचं नाही? धनंजय मुंडे कोणत्या दिशेला घेऊन चाललाय? आंदोलनं करायला सांगतो. प्रतिमोर्चे काढायला सांगतो.
तसेच धनंजय मुंडे तुमच्या घरातील कोणी मेल्यावर किंवा मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुम्ही जाळात हात घालू नका. माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलत आहात. तुम्ही असाच त्रास देत राहिलात, तर मराठ्यांना उठाव करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मी जातीवाद करत नाही पण…
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, ‘मी जातीवाद करत नाही. पण, मराठ्यांना न्याय मागताना, संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना, कोणाला जातीवाद वाटत असेल, तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या. मी न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही’.
हेदेखील वाचा : Maha Vikas Aghadi broke : शिवसेना तर पडली महाविकास आघाडीच्या बाहेर! कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे तरी काय?