
UMC Housing scheme, Housing Project Pmay
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये (Summery)
शहराच्या विकासचित्रात आधीच महत्त्वपूर्ण बदल घडले आहेत. खासदार डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून वाहतुकीला गती मिळाली आहे. अनधिकृत इमारतींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुनर्विकासाचा मार्ग स्वीकारण्यात आला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. विविध महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना शासन स्तरावर मंजुरी मिळून शहराचा विकास वेगाने होत आहे.या सर्व प्रकल्पांनंतर आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती होत असल्याने हजारो कुटुंबांना स्थिर आणि सुरक्षित निवारा मिळणार आहे. योजनेच्या तरतुदीनुसार पात्र लाभार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने घरांचे वाटप करण्यात येणार आहे, ज्यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल.
उल्हासनगर महानगरपालिकेने ३५७८ घरांच्या बांधकामासाठी सविस्तर निविदा जाहीर केल्या असून, या प्रकल्पासाठी ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये इतका निधी निश्चित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शहरातील गृहनिर्माण क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडणार असून अनेक कुटुंबांना सुरक्षित, टिकाऊ आणि मानक सुविधांनी युक्त घरे मिळणार आहेत.
उल्हासनगर आता गृहनिर्माण क्रांतीच्या दिशेने वेगाने पुढे जात असून, हा प्रकल्प शहराच्या सर्वांगीण विकासासाठी टप्प्याटप्प्याने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Ans: हा प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) राबवला जात आहे.
Ans: या प्रकल्पांतर्गत ३५७८ परवडणाऱ्या घरांचे बांधकाम केले जाणार आहे.
Ans: या महाप्रकल्पासाठी ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये इतका भव्य निधी निश्चित करण्यात आला आहे.
Ans: आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील (LIG) कुटुंबांना सुरक्षित, परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
Ans: योजनेच्या तरतुदीनुसार पात्र लाभार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने घरांचे वाटप करण्यात येणार आहे, ज्यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचेल.