
समर्थ मंदिर परिसरात पालिकेचा बुलडोझर
सातारा : समर्थ मंदिर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीला जबाबदार ठरत असलेल्या अतिक्रमणांवर अखेर सातारा पालिकेने सोमवारी बुलडोझर फिरवत मोठी कारवाई सुरू केली. पहाटेपासूनच पालिकेचे पथक, पोलीस बंदोबस्त आणि यंत्रसामग्री परिसरात दाखल झाल्याने समर्थ मंदिर परिसर रणांगणात बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पालिकेने यापूर्वी अनेक वेळा नोटिसा बजावूनही संबंधित मिळकतधारकांनी अतिक्रमणे हटवण्यास टाळाटाळ केल्याने प्रशासनाने अखेर थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला. आम्ही स्वतः काढून घेतो, अशी विनंती करत काहींनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पालिकेने कोणतीही माघार न घेता नियोजित मोहिमेला सुरुवात केली. रुंदीकरण मोहिमेसाठी अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, शहर विकास विभाग, आरोग्य विभाग आणि विद्युत विभागाची संयुक्त फौज मैदानात उतरली होती. शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस आणि वाहतूक शाखेचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कारवाईदरम्यान इक्बाल बागवान यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी तत्काळ धाव घेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरातील वातावरण अधिकच तापले होते.
पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे समर्थ मंदिर ते बोगदा मार्गावरील अनेक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत बुलडोझरची मोहीम वेगात सुरू होती. सुमारे ३० मिळकतधारकांवर कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त नागरिकांनी पालिकेच्या कारवाईचे स्वागत केले असून “उशिरा का होईना, पण प्रशासन जागे झाले” अशा प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहेत.
शासकीय जमिनींवरील निवासी अतिक्रमणे होणार नियमित
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदी नुसार तसेच 25 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न सोडव्यासाठी शासकीय जनिनींवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम 40 आणि 51 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील नियम ४३, ४३(अ) आणि ५२ अंतर्गत काही अटी व शर्तींनुसार १ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यापूर्वीची आणि सध्या अस्तित्वात असलेली केवळ निवासी अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत.
Pimpri News : तुम्हीही अनधिकृत बांधकाम केलंय? तर आता महापालिकेचा हातोडा पडणार