Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराचा नारळ फुटला; खासदार मेधा कुलकर्णी यांची अनुपस्थिती; वाचा नेमकं काय आहे कारण………

Pune Lok Sabha Election 2024 : पुण्यातील लोकसभेच्या तिकीटावरून अनेक रस्सीखेच सुरू असताना, काल मुरलीधर मोहोळ यांच्या नावाला भाजपच्या वरिष्ठांनी दिल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन मी प्रचाराची सुरुवात केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचे आहे. पुणेकर आपले मत भाजपला देतील, याचा मला विश्वास आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाली तेव्हा महायुतीचे सगळे नेते उपस्थित होते.

  • By युवराज भगत
Updated On: Mar 14, 2024 | 03:53 PM
Muralidhar Mohol's campaign broke in Pune, MP Medha Kulkarni's absence, read what exactly is the reason...

Muralidhar Mohol's campaign broke in Pune, MP Medha Kulkarni's absence, read what exactly is the reason...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली. ग्रामदेवतांच्या दर्शनाने करीत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आल्या नाही. त्याचे कारण मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. दरम्यान, पुणे शहर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत होते. भाजपच्या बैठकीत निवडणुकीत कामाला लागण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले. मोहोळ यांना विक्रमी मतांनी निवडून आणा, असे त्यांनी म्हटले.

मेधा कुलकर्णी का आल्या नाहीत?
ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन मी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचं आहे. पुणेकर आपले मत भाजपला देतील, याचा मला विश्वास आहे. प्रचार सुरु करताना महायुतीचे सगळे नेते उपस्थित आहेत. सगळे आमदार आज येथे उपस्थित आहेत. हा आमच्या विजयाचा संकल्प आहे. खासदार मेधा कुलकर्णी दिल्लीत आहेत. म्हणून त्या आल्या नाहीत, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मोदींनी पुण्याचा विकास केला
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराचा विकासाकडे चांगले लक्ष दिले आहे. अनेक प्रकल्प आणि योजना पुणे शहरात सुरु केल्या आहेत. आता पुणेकर सुद्य आहेत ते विकासाला प्राधान्य देतील. सगळे पुणेकर आमच्या सोबत आहे. 100 टक्के आमची एकी शेवटपर्यंत राहणार आहे. दरम्यान, पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी जनतेपर्यंत जाण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास
मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास पुणे मनपातून सुरु झाला. ते नगरसेवक झाले. मनपाच्या शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. २००९ मध्ये खडकवासला विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. २०१७-१८ मध्ये पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते. तसेच २०१७-१८ मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक, पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सभासद ते होते. पुणे शहराचे महापौर म्हणून त्यांनी २०१९ ते २०२२ दरम्यान जबाबदारी सांभाळली आहे. तसेच २०२३ मध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीसपदावर ते होते.

Web Title: Muralidhar mohols campaign broke in pune mp medha kulkarnis absence read what exactly is the reason nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2024 | 03:53 PM

Topics:  

  • Muralidhar Mohol
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

Donald Trump चा G-7 देशांवर दबाव, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारत-चीनवर अधिक Tariff
1

Donald Trump चा G-7 देशांवर दबाव, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारत-चीनवर अधिक Tariff

पुणेकरांसाठी खुशखबर! Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी; कसा असणार प्रोजेक्ट? पहाच…
2

पुणेकरांसाठी खुशखबर! Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी; कसा असणार प्रोजेक्ट? पहाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.