Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन

Muralidhar Mohol: ड्रोन शोबरोबरच गायक अवधूत गुप्ते यांनी मराठी आणि देशभक्तिपर गाण्यांची सुरेख मैफल सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2025 | 09:59 PM
पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन

पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन

Follow Us
Close
Follow Us:
आज पंतप्रधान मोदी यांचा 75 वा वाढदिवस 
पुण्यातील एस.पी. कॉलेजमध्ये भव्य ड्रोन लाईट शो
मंत्री मुरलीधर मोहोळ यांची संकल्पना

पुणे: Pune Drone Show: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (१७ सप्टेंबर) पुण्यातील एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य ड्रोन लाईट शोचं आयोजन करण्यात आलं. रात्री ८ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात तब्बल १,००० ड्रोनच्या माध्यमातून आकाशात विविध आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या.

अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा शो आयोजित करण्यात आला होता. पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या दृश्याचा आनंद घेतला. ड्रोन शोच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील महत्वाच्या कामगिरी, विकसित भारत ही संकल्पना तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास यांचे दर्शन घडवण्यात आले.

विशेष म्हणजे, ड्रोनच्या माध्यमातून ऑपरेशन सिंधूर, गणपती बाप्पा, लोकमान्य टिळक, Make in India लोगो, मोदी आणि त्यांच्या आईचे फोटो, भारत मातेचा फोटो, ज्ञानेश्वर माऊली, महात्मा ज्योतिराव व सावित्रीबाई फुले, श्रीराम मंदिर आणि ग्यारा साल बेमिसाल अशा विविध प्रतिकृती आकाशात झळकल्या. प्रकाश आणि तंत्रज्ञानाच्या या अनोख्या मेळाव्याने प्रेक्षक थक्क झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. ड्रोन शोबरोबरच गायक अवधूत गुप्ते यांनी मराठी आणि देशभक्तिपर गाण्यांची सुरेख मैफल सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यांच्या गाण्यांनी कार्यक्रमाला उत्साह आणि उर्जा दिली. पुण्यातील नागरिकांनी या भव्य शोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रकाश, संगीत आणि देशभक्तीचा संगम झालेला हा अविस्मरणीय सोहळा पुणेकरांच्या मनात दीर्घकाळ कोरला जाईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

देशभरात ७५,००० आरोग्य शिबिरे आयोजित

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस आहे. या निमित्ती देशभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. विशेषकरुन महिला आणि मुलांसाठी आज केंद्र सरकारने स्वस्थ नारी, सशक्त परिवार मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत याचा उद्देश महिला आणि मुलांसाठी आरोग्य सेवा मजबूत करणे, चांगली उपलब्धता, दर्जेदार काळजी सुनिश्चित करणे आहे.

PM Modi @75: पंतप्रधान मोदींंच्या वाढदिवसानिमित्त महिला आणि मुलांसाठी खास रिटर्न गिफ्ट; देशभरात ७५,००० आरोग्य शिबिरे आयोजित

शभरात ७५ हजार आरोग्य शिबिरे आयोजित केले जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शिबिरे आयुष्यामान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी आरोग्य संस्थांमध्ये आयोजित केली जाती. या शिबिरांमध्ये विशेष करुन महिला आणि मुलांच्या आरोग्यवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. याअंतर्गत आरोग्य तपासणी, आवश्यक उपचारही दिले जाणार आहेत. देशातील प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

 

Web Title: Murlidhar mohol idea 1000 drones show sp college sent birthday wishes to pm narendra modi pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 09:51 PM

Topics:  

  • murlidhar mohol
  • PM Narendra Modi Birthday
  • Pune

संबंधित बातम्या

Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल
1

Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल

ModiForYouth : पंतप्रधान मोदी कसे बनले तरुणांचे आवडते? ‘ही’ आहेत त्यांना युथ आयकॉन बनवणारी 10 प्रमुख कारणे
2

ModiForYouth : पंतप्रधान मोदी कसे बनले तरुणांचे आवडते? ‘ही’ आहेत त्यांना युथ आयकॉन बनवणारी 10 प्रमुख कारणे

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर बनणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत; मोदींच्या वाढदिवशी दिले सरप्राईज
3

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर बनणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत; मोदींच्या वाढदिवशी दिले सरप्राईज

Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण
4

Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.